Tuesday, October 15, 2024
Home ताज्या तटाकडील तालीम प्रभागात ब्रम्हेश्वर मंदिर मध्ये "सर्व उमेदवार एकत्रित मिलन हा राबविण्यात...

तटाकडील तालीम प्रभागात ब्रम्हेश्वर मंदिर मध्ये “सर्व उमेदवार एकत्रित मिलन हा राबविण्यात आला अनोखा उपक्रम

तटाकडील तालीम प्रभागात ब्रम्हेश्वर मंदिर मध्ये “सर्व उमेदवार एकत्रित मिलन हा राबविण्यात आला अनोखा उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रभाग क्र.४८ तटाकडील तालीम कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडनूक २०२१ पार्श्वभूमीवर सौ.भारती सतीश पाटील यांच्या संकल्पनेतुन एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला.यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांना एकत्र बोलवुन निवडनुक मैत्रीपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडाण्याचा हा संकल्प करण्यात आला, ब्रम्हेश्वर मंदिरात महादेव पिंडीचे पूजन करुन जेष्ठ नागरिकाच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ केला.या वेळी इच्छुक उमेदवार सौ.भारती सतीश पाटील
सौ मयुरी महेश उरसाल
सौ.ॠतुजा तेजस जाधव
सौ. शुभदा योगेश्वर जोशी
सौ.नम्रता मंगेश पाटील
उपस्थित होते. स्वागत सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश पाटील यांनी केले. हिंदुत्ववादी संघटनेचे श्री महेश उरसाल यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,कोल्हापूर शहरातील हा सर्वात पहिला अभिनंदनीय आणि आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला आहे.दर ५ वर्षांनी निवडणूक येते मात्र त्यासाठी वर्षानुवर्षे आपले एकमेकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध राजकारणामुळे का तोडायचे ? प्रसंगी नेते एकत्र येतात मात्र विनाकारण उमेदवार एकमेकांना वाईट होतात. यावर ” सर्व उमेदवार एकत्रित मिलन” हा रामबाण उपाय योजला गेला आहे. हा कार्यक्रम म्हणजे आगामी येणारी निवडणूक मैत्रीपूर्ण वातावरणात लढविली जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.फक्त निवडणुकीसाठीच नव्हे तर आपण नेहमीच प्रभागातील एकमेकांच्या मदतीसाठी उपलब्ध असायला हवे. उमेदवार सौ भारती सतीश पाटील यांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि आभार मानत उपस्थित इतर उमेदवारांनाही निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी शुभेच्छा देत आहोत.
यावेळी शिवसेनेचे रणजीत जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.त्यानंतर सर्व महिला उमेदवारांनी आपला परिचय करून दिला आणि मतदान करण्याचे आवाहन केले.यावेळी तटाकडील तालीमचे भाऊ गायकवाड , सुजय साळोखे ,निवृत्ती तरुण मंडळाचे पांडुरंग शेळके गुरुजी रामचंद्र इंगवले, सायब पोवार, किरण पोवार ,अचानक तरुण मंडळाचे परेश वेढे ,हिंदवी स्पोर्ट्सचे अमित जाधव ,युवासेनेचे विश्वदीप साळोखे आदींसह भागातील ज्येष्ठ नागरिक ,महिला युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments