Thursday, November 21, 2024
Home ग्लोबल करवीर छत्रपती घराण्याचा लोककल्याण व जनसेवेचा वसा व वारसा समर्थपणे पुढे चालवणाऱ्या...

करवीर छत्रपती घराण्याचा लोककल्याण व जनसेवेचा वसा व वारसा समर्थपणे पुढे चालवणाऱ्या श्रीमंत युवराज संंभाजी महाराजांचा आज ५० वा वाढदिवस संपन्न होत आहे. यानिमित्ताने आतापर्यंतच्या त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

दि. ११ फेब्रुवारी १९७१ रोजी बेंगलोर येथे युवराजांचा  जन्म झाला. त्यांचे शिक्षण राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्या शाळेत शिकले त्या राजकोट येथील राजकुमार कॉलेज येथे झाले. त्यांनी बी.ए., एम.बी.ए. या पदव्या संपादित केल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉल, पोहणे व घोडेस्वारी या क्रीडा प्रकारांत त्यांना विशेष रस आहे. पर्यटन फोटोग्राफी व वाचन हे त्यांचे आवडते छंद आहेत.
विद्यार्थी दशेतच त्यांनी देशभरातील अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या, यातूनच गडकिल्ल्यांच्या विषयी त्यांच्या मनात आत्मियता निर्माण झाली. आज त्यांचं गडकिल्ल्यांवर चाललेलं काम आदर्शवत व मार्गदर्शक मानलं जातं. त्यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातील हजारो तरुण गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. दुर्गराज रायगड किल्ल्यावर शास्त्रोक्त पध्दतीने उत्खनन करणे, जतन करणे, तसेच गडाचे ऐतिहासिक महत्त्व, दुर्गमत्त्व अबाधित ठेवून पर्यटनाच्या दृष्टीने गडाचा विकास करण्यासाठी युवराज संभाजी नेहमीच प्रयत्नशील असतात. गडावर होणाऱ्या प्रत्येक कामावर त्यांचे बारीक लक्ष असते. रायगडावर महिन्यातून किमान एकतरी भेट त्यांची ठरलेलीच असते. महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याच्या उद्देशाने त्यांचे कार्य सुरू आहे. त्याकरिता महाराष्ट्रातील सर्व किल्ले संवर्धन, संस्था, संघटना, आणि व्यक्ती यांना एका छताखाली आणण्याच्या उद्देशाने “फोर्ट फेडरेशन” ची स्थापना केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे युवराजांच्या जीवनाचे आदर्श आहेत. त्यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे हे विचार स्वतः अंगीकृत करून त्यावर परिश्रमपूर्वक वाटचाल करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.  ‘सह्याद्री प्रतिष्ठान’, ‘अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती’, या संस्थांचे ते प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच दुर्गराज रायगडावर  प्रतिवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला जातो. युवराजांच्या प्रयत्नांतून राजसदरेवर रिकाम्या मेघडंंबरीत शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसविण्यात आली आहे. खासदार होऊन राजधानी दिल्ली येथे गेल्यानंतर तिथे भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. ज्यायोगे विखुरलेला महाराष्ट्री समाज एकत्र आणला. संसद भवनात राजर्षी शाहू महाराजांची जयंती सुद्धा सुरू केली, ज्यामध्ये देशातील सर्वपक्षीय खासदार, सहभागी होत असतात. अश्याप्रकारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि स्वतः सहभाग घेऊन महाराष्ट्राची संस्कृती दिल्लीत दाखवण्याचा प्रयत्न युवराज नेहमीच करत आहेत.
  छत्रपती शिवाजी महाराजांचे व राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र सर्वसामान्यांपर्यंत तसेच विद्यार्थ्यांपर्यंत पाहोचावे, तसेच  संसदेतील प्रत्येक खासदार व विधीमंडळातील आमदार, राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच विदेशी राजदूत  यांच्या भेटीवेळी आवर्जून छत्रपती शाहू महाराज, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर  हिंदी किंवा इंग्रंजी ग्रंथ भेट म्हणून  देत असतात.
मराठा साम्राज्याच्या इतिहासावर अभ्यास करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था युवराजांच्या कायम संपर्कात असून, त्यांना त्यांचे नेहमीच सहकार्य लाभत असते.
कोल्हापूरातील क्रीडा क्षेत्रातील अग्रेसर संंस्था कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेचे ते पेट्रन आहेत. आपल्या खासदारकीच्या माध्यमातून ‘मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम’साठी भरघोस निधी केंद्राकडून मंजूर करून आणला, ज्या माध्यमातून तिथे आतंरराष्ट्रीय दर्जाचे टर्फ बसवण्यात येणार आहे.
 कोल्हापुरातील  शिवाजी पुलाचे काम सुरू करण्यात त्यांनी. भूमिका निभावली. पुरातत्व खात्यासोबत गेली अनेक दशके काम करत असल्याने, त्या अनुभवाचा आणि संपर्काचा उपयोग करुन, प्रसंगी कायद्यामध्ये बदल करुन पुलाचे काम पुर्णत्वास नेले.
  कोल्हापूर विमानतळाच्या आधुनिकीकरनाकरिता निधी मंजूर करणे, नवीन विमानसेवा सुरू करून आणणे, तसेच विमानतळाचे नाव ‘छत्रपती राजाराम महाराज’ असे करण्याकरिता सतत पाठपुरावा करणे इत्यादी कामे केली. येत्या काही दिवसात मोठी विमाने धावपट्टीवर धावताना दिसतील. पुर्णक्षमतेने विमानसेवा कोल्हापूरात सुरु होईल.
युवराज  कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी ‘शिव-शाहू मंच ट्रस्ट’ व ‘छत्रपती संभाजीराजे फाऊंडेशन’ची स्थापना केली असून या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून  त्यांचे विविध सामाजिक उपक्रम सुरू असतात. कोरोना महामारीच्या काळात रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असलेली रुग्णवाहिका कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी अर्पण करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच अद्ययावत सुविधायुक्त रुग्णवाहिका ठरली आहे.
युवराज, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच कार्यरत असतात. त्यातूनच त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रातील प्रत्येक तालूका, गावपातळीवर तयार झाला आहे. शिव-शाहू यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील बहुजन समाजाला एकत्र आणण्याचं काम युवराजांनी केलं.आणि आजही ते करत आहेत.
 तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबरच संसदेत लोकशाही मार्गाने आंदोलन केले आहे.  मुंबई येथे शेवटच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आझाद मैदानात  केलेल्या आवाहनाला  मराठा समाजाने  दिलेला प्रतिसाद दोघांचा एकमेकांच्या विषयी असलेला विश्वास दर्शवतो. अतिशय अक्रमक परिस्थीतीत युवराजांनी हाताळलेली परिस्थिती महाराष्ट्रातल्या सामाजिक एकोप्याला अबाधित ठेवणारीठरली.
 आज  केंद्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
दोन वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भीषण महापूरात युवराजांनी केलेल कार्य जनतेच्या मनात आजही कायम आहे. जास्तीत जास्त जीवितहानी टाळण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दल, व नौदलाची मदत आणण्यासाठी केलेली धडपड आणि स्वतः धोका पत्करून प्रत्यक्ष पाण्यात उतरुन पुरग्रस्तांना केलेलं मदतकार्य कोल्हापूर व सांगलीकर  कधीही विसरू शकणार नाहीत. पूर ओसरल्यानंतर पूरबाधित लोकांचे संसार उभारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं, त्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो ट्रक अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या. त्याची नियोजनबद्ध वितरण व्यवस्था त्यांच्या कडून उभा करण्यात आली व प्रत्येक पूरबाधित व्यक्तीपर्यंत मदत पोहोच करण्यात आली.
कोल्हापूर शहराला व जिल्ह्यातील इतर गावांना पाईपलाईन द्वारे गँस मिळावा यासाठी  विशेष प्रयत्न करुन, गँस पाईप लाईन मंजूर करुन आणली. याचा लाभ प्रत्येक कुटुंबाला होणार आहे. जिल्ह्याच्या विकास स्थायी स्वरुपाचा व्हावा, पर्यटनाच्या माध्यमातून आतंरराष्ट्रीय नकाशावर कोल्हापूरचे नाव यावे यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न असतात.
अगदी अलिकडे मराठवाडा, विदर्भ, खानदेश परिसरात अवकाळी पावसाने थैमान घातले. अनेकांच्या शेतजमिनींचे नुकसान झाले. शेतातील उभी पिके पाण्याने वाहून गेली. त्यांच्या मदतीला युवराज संभाजी धावून गेले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यथा समजून घेतल्या. शेतकऱ्यांना दिलासा दिला.आत्महत्याग्रस्तांच्या घरी जावून त्यांना धीर दिला. नुकसानभरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूर्ण अहवाल सादर केला. शासनाने त्याची दखल घेत बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.
आजही युवराज महाराष्ट्रभर फिरत असतात. राजवाड्यात ते कमीच वास्तव्यास असतात. त्यांना माणणारा मोठा वर्ग देशभरात आहे. निष्कंलक, चारित्र्यवान, कृतीशील व अजातशत्रू नेतृत्व आणी आपली मते परखडपणे मांडणारे म्हणून युवराज संभाजी महाराज महाराष्ट्रातून पुढे येत आहेत.
त्यांना ५०व्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments