Friday, July 19, 2024
Home ताज्या मयुरा स्टिल्सचा केआयटी आयडिया लॅबसाठी ५५ लाखाचा निधी विद्यार्थ्यांच्या कल्पक अविष्कारासाठी उद्योगजगतातून...

मयुरा स्टिल्सचा केआयटी आयडिया लॅबसाठी ५५ लाखाचा निधी विद्यार्थ्यांच्या कल्पक अविष्कारासाठी उद्योगजगतातून जमला कोटीचा निधी

मयुरा स्टिल्सचा केआयटी आयडिया लॅबसाठी ५५ लाखाचा निधी विद्यार्थ्यांच्या कल्पक अविष्कारासाठी उद्योगजगतातून जमला कोटीचा निधी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर येथे उभारण्यात येणा-या, एआयसीटीची संकल्पना असणा-या व केआयटीच्या विद्याथ्र्यांसाठी महत्वकांक्षी प्रकल्प असणा-या एआयसीटीई आयडिया लॅब साठी मयुरा स्टिल्स प्रा. लि. कोल्हापूर यांच्याकडून शीर्षक प्रायोजकत्व (टायटल स्पॉन्सरशीप) स्वीकारुन केआयटीला या प्रकल्पासाठी तब्बल ५५ लाखांचा निधी देत असल्याचे मयुरा स्टिल्सचे चेअरमन चंद्रशेखर डोली यांनी जाहिर केले. यावेळी केआयटीचे चेअरमन भरत पाटील आणि इतर विश्वस्त उपस्थित होते.
विदयार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना संधी देण्यासाठी व विज्ञान व तंत्रज्ञानाचे अविष्कार प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे अनुभवण्यासाठी एआयसीटीने आयडीया लॅब ही संकल्पना मांडली. ही लॅब पदवी, पदविका, शालेय विद्यार्थी तसेच उद्योजगतातील तज्ञांसाठी २४ तास खुली व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असेल. एआयसीटीई देशातील १०० गुणवत्ता धारक महाविद्यालयांना या लॅबची मान्यता देणार असून प्राधान्याने त्यात ग्रामीण व निमशहरी भागात स्थापन होणार आहेत. या लॅबच्या माध्यमातून व्याख्याने विविध कार्यशाळा, शिबीर, प्रात्यक्षिके असे अनेकाविध उपक्रम नियोजित आहेत.
एआयसीटीला या लॅबचा प्रस्ताव पाठविण्यासाठी कमीत कमी ५५ लाखांचा निधी उद्योगजगतातून उभा करणे बंधनकारक आहे. मग तेवढीच रक्कम एआयसीटीकडून या लॅबसाठी दिली जाणार आहे. या नियमानुसार केआयटीने विविध उद्योजकांना व कंपन्यांना प्रायोजकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अनेक कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन जवळपास १ कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण होत आहे. त्यातील मयुरा स्टील्सने शीषर्क प्रायोजकत्व स्वीकारल्यामुळे ही लॅब आता मयुरा आयडिया लॅब म्हणून ओळखली जाईल. केआयटी आणि उद्योग जगत यांचे केआयटीच्या स्थापनेपासून संबंध दृढ आहेत. केआयटीचा अभ्यासक्रम, विद्याथ्र्यांची इंटर्नशीप, वेगवेगळे प्रकल्प तसेच प्लेसमेंट अशा विविध कारणांनी केआयटीच्या प्रगतीला उद्योग क्षेत्रातील नामवंत कंपन्या व तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभत असते. आज चंद्रशेखर डोली यांनी केआयटीमध्ये उपस्थित राहून या लॅब साठी ५५ लाख देत असल्याचे जाहिर केले. व त्याबाबतचे पत्र केआयटीचे चेअरमन भरत पाटील यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी केआयटीचे अध्यक्ष श्री. भरत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी व सचिव श्री. दिपक चौगुले, मा. विश्वस्त सचिन मेनन, मा. विश्वस्त साजिद हुदली, संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, संशोधन व विकास अधिष्ठाता प्रा. शिवलिंग पिसे, प्रा.सुभाष माने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments