Thursday, November 21, 2024
Home ताज्या शेवटच्या माणसाला लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ...

शेवटच्या माणसाला लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला विश्वास

शेवटच्या माणसाला लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला विश्वास
कागल/प्रतिनिधी : मतदार संघातील शेवटच्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कोरोना प्रतिबंधक लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा विश्‍वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ज्यांची ऐपत आहे त्यांना ही लस बाजारात उपलब्ध झाली पाहिजे आणि गोरगरिबांना मोफत मिळाली पाहिजे, अशी मागणीही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केली.कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयात कोरणा प्रतिबंधक लसीचा समारंभपूर्वक वितरण शुभारंभ झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री मुश्रीफ उपस्थित होते मंत्री श्री मुश्रीफ यांनी हीलस रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनिता पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.                    मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, संपूर्ण जग वर्षभर शोधात होते, त्याचे उत्तर या लसीच्या रूपाने सापडले आहे.यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कोरोना विरुद्धच्या लढाईत कोरोना योध्द्याबरोबरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ नेहमीच अग्रभागी राहिले. या लसीची निर्मिती ही एक क्रांतीच आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्याद्वारा ही एक दर्जेदार व गुणवत्तापूर्वक लस निर्माण झाली आहे. या लसीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका.
यावेळी प्रवीणसिंह पाटील, पंचायत समितीच्या सभापती सौ. पुनम महाडिक – मगदूम, उपसभापती सौ. अंजना सुतार, जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, डॉ. अभिजित शिंदे, माजी सभापती सौ राजश्री माने आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ रवी बल्लाळ यांनी केले.

चौकट …..
गोरगरिबांना मोफत लस द्या…..
मंत्री मुश्रीफ म्हणाले, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला यांनी ही लस जानेवारीत उपलब्ध होईल असा शब्द दिला होता. बोलल्याप्रमाणे त्यांनी तो शब्द खरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे माझी मागणी आहे की ज्यांची ऐपत आहे त्यांना बाजारात ही लस उपलब्ध करून द्या. तसेच गोरगरिबांना ही लस मोफत मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणीही श्री मुश्रीफ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments