Friday, November 22, 2024
Home ताज्या     आनंदराव पाटील -चुयेकर यांनी गोरगरिबांचे संसार सुखी व  समृद्ध केले! सातव्या पुण्यतिथीनिमित्त...

    आनंदराव पाटील -चुयेकर यांनी गोरगरिबांचे संसार सुखी व  समृद्ध केले! सातव्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिवादन….

आनंदराव पाटील -चुयेकर यांनी गोरगरिबांचे संसार सुखी व  समृद्ध केले! सातव्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिवादन….
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कै. आनंदराव पाटील- चुयेकर यांनी दूध व्यवसायाच्या माध्यमातून गोर -गरिबांचे संसार सुखी व समृद्ध केले, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने धवलक्रांती रुजवली आणि ती यशस्वी केली, असे ते पुढे म्हणाले.करवीर तालुक्यातील चुये या श्री. पाटील यांच्या मूळ गावी भेट देऊन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सातव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले.
यावेळी बोलताना मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, महाराष्ट्रासह देशाच्या तुलनेत दुग्धव्यवसाय कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला दिसतो. या सगळ्यांच्या पाठीशी स्वर्गीय कै. आनंदराव पाटील -चुयेकर यांची धडपड, तळमळ आणि जिद्द आहेच.मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध ठेवून गावाचे सरपंच पद २५ वर्ष भूषविलेल्या श्री. पाटील यांनी गोकुळची उभारणी व विस्तार यशस्वीरित्या केला. तसेच केडीसीसी बँकेचे संचालक पद व उपाध्यक्ष पद, शेतकरी संघाचे दीर्घकाळ संचालक व अध्यक्ष पद, व बिद्री कारखान्याच्या संचालक पदासह जिल्हा परिषद सदस्य पदही त्यांनी भूषविले आहे.

चौकट………
जोडधंदा न्हवे मुख्यधंदा……
मंत्री मुश्रीफ म्हणाले, दूध धंदा हा शेतीला जोडधंदा मानला जातो. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात मात्र दूध धंदाच मुख्य धंदा वाटावा एवढी व्याप्ती मोठी आहे. दुग्ध व्यवसायामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समृद्ध आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण आपल्या जिल्ह्यात नाही, असे ते पुढे म्हणाले.यावेळी शशिकांत पाटील – चुयेकर, माणिक पाटील -चुयेकर, सुयोग वाडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments