Tuesday, July 23, 2024
Home ताज्या टीचर्स विथ फार्मर्स कोल्हापूर जिल्हा शेतकरीविरोधी कृषी कायदे आणि कामगार विरोधी श्रम...

टीचर्स विथ फार्मर्स कोल्हापूर जिल्हा शेतकरीविरोधी कृषी कायदे आणि कामगार विरोधी श्रम संहिताची होळी

टीचर्स विथ फार्मर्स कोल्हापूर जिल्हा
शेतकरीविरोधी कृषी कायदे आणि कामगार विरोधी श्रम संहिताची होळी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर मोदी सरकारने केलेले काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी गेल्या पन्नास दिवसांपासून दिल्लीच्या सर्व सीमावर प्रचंड धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे या आंदोलनात १२० हून अधिक शेतकरी शहीद झाले तरी मोदी सरकारने गांभीर्याने निर्णय घेण्याऐवजी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले आहे सुप्रीम कोर्टाने या कायद्याच्या अंमलबजावणीसा स पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे परंतु समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींची नेमणूक केली असल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवले आहे शेतकऱ्यांवर हा अन्याय व दडपशाही मान्य करणे शक्य नाही म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी या किसान आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे कारण बहुसंख्य शिक्षक हे शेतकरी कुटुंबातील असून शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे करून घेणे शक्य नाही या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून टीचर्स विथ फार्मर्स कोल्हापूर जिल्हा या समितीच्या वतीने आज दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर काळ्या कृषी कायद्यांची होळी करण्यात आली तसेच मोदी सरकारने कामगार हिताच्या विरोधात सर्व कामगार कायदे बदलून चार श्रम संहिता मंजूर केले आहेत ब्रिटिश राजवटीपासून कामगार चळवळीने लढून मिळवलेले कामगार कायद्यांचे लाभ काढून घेण्याचे काम केंद्र सरकारने केली आहे त्याविरोधात केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशभर आंदोलन सुरू आहे २६ नोव्हेंबर दोन हजार वीस च्या देशव्यापी संपात कोट्यावधी कामगारांनी सहभाग घेतला परंतु  मोदी सरकारने त्यांच्या मागण्या बाबत ब्र ही काढलेला नाही कृषी कायद्याबरोबरच चार श्रम संहितांची होळी करण्यात आली
या आंदोलनात प्रा.डॉ.सुभाष जाधव प्रा.डॉ.डी.एन.पाटील, राजेश वरक,सी.एम.गायकवाड, दत्तात्रय पाटील,महादेव साबळे महेश सूर्यवंशी,हेमलता पाटील शिक्षक समितीचे सुधाकर सावंत उमेश देसाई,संजय पाटील युवराज सरनाईक ,बळवंत कांबळे ,राजेंद्र पाटील,सुभाष धादवड, शकील भेंडवडे,संतोष कदम,सि.टी. केंगले,नियाज नदाफ, अनिल शेलार विनोद गायकवाड आधी शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments