कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे वीज बिल भरणार नाही फलकाचे छत्रपती शिवाजी चौकात भव्य उदघाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : वीज बिल भरणार नाही, या आशयाचा फलक छत्रपती शिवाजी चौक येथे कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे उभारण्यात आला. त्याचे उदघाटन संघाचे पदाधिकारी, संचालक व वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीने आज करण्यात आले.
यावेळी निवास साळोखे, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे यांच्यासह कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर) यांनी मार्गदर्शन केले. वीज बिल भरणार नाही, माफ करा, माफ करा वीज बिल माफ करा, अशा घोषणांनी शिवाजी चौक दुमदुमुन गेला. दरम्यान, गांधी मैदान येथून गुरुवारी (ता. ७ जानेवारी २०२१) रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने वाहनांसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी कृती समितीला कामानिमित्त सराफ व्यापारी संघाचा हॉल वापरण्यास घ्यावा. त्याचबरोबर गुरुवारच्या मोर्चा मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिक सहभागी होतील, अशी ग्वाही दिली.
यावेळी बाबा भुयेकर, जयकुमार शिंदे, सुजित चव्हाण, संचालक शिवाजी पाटील, बन्सी चिपडे, नंदकुमार ओसवाल, राजू बारस्कर, शीतल पोतदार यांच्यासह सराफ संघाचे सभासद व वीज बिल भरणार नाही कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.