जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ३० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. २२ (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सन २०१९-२० या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ३० डिसेंबर पर्यंत सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.
पुरस्कार पात्रतेचे निकष याप्रमाणे-
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असावे. त्याने वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत. संबधीत जिल्ह्यामध्ये सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्हयातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील. सांघिक /वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य/ जिल्हा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला प्रथम ३ क्रमांकापर्यन्त यश मिळ्वणारे किमान ३ खेळाडू घडविणारा मार्गदर्शक. अर्जदाराने मार्गदर्शन केलेल्या खेळाडू/ खेळाडुंची विहित नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत स्वतंत्रपणे जोडणे आवश्यक आहे. (हमीपत्राकरिता कार्यालयाशी संपर्क साधावा.)
गुणवंत खेळाडु पुरस्कार -: या पुरस्कारासाठी (१ महिला ,१ पुरुष,व १ दिव्यांग खेळाडू) अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष वास्तव्य असावे. खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगत पूर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. खेळाडुंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य / राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षाच्या लगतपूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ /कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ठ तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.
जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अधिकृत क्रीडाप्रकार
अ.क्र.
खेळाचे नाव
अ.क्र.
खेळाचे नाव
धनुर्विदया {आर्चरी}
२३ मुष्ठीयुध्द {बॉक्सींग}
मैदानी क्रीडा स्पर्धा {अँथलेटिक्स}
२४ क्रिकेट,बॅडमिंटन
२५ फूटबॉल,
बिलियर्डस अँड स्नुकर
२६ हँडबॉल,कॅरम
२३ हॉकी बुध्दीबळ (चेस) २८ ज्युदो सायकलिंग २९ कबड्डी, तलवारबाजी {फेन्सिंग}
३० कनोईंग / कयाकिंग
गोल्फ ३१ खो खो जिम्नॅस्टिक ३२ भारोत्तोलन {पॉवरलिफ्टींग} अश्वारोहन {हॉर्स रायडिंग} ३३ रोईंग
लॉन टेनिस ३४ तायक्वांदो मल्लखांब
३५ व्हॉलीबॉल
नेमबाजी {शुटींग}
३६ वजन उचलणे {वेटलिफ्टींग}
स्केटिंग ३७
कुस्ती {रेसलिंग}
स्क्वॅश ३८ वुशू
जलतरण {स्विमिंग} [डायव्हिंग, वॉटरपोलो]
३९ यॉटींग १८
टेबल टेनिस ४०
सॉफ्टबॉल ट्रायथलॉन
४१ रग्बी आटयापाटया
४२ मॉडर्न पेंटॉथलॉन
बास्केटबॉल ४३
बेसबॉल शरीरसौष्ठव {बॉडीबिल्डींग} ४४ स्पोर्ट क्लाइंबिंग