कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत दिग्गजांमध्ये उत्साह तर नाराजीही
कोल्हापूर/(श्रद्धा जोगळेकर) बऱ्याचदा आरक्षण सोडत यावर विविध आक्षेप घेतले जातात ते बरोबरही आहे कारण पाच वर्ष तयारी करायची विकास करायचा आणि भागाचे आरक्षण काय पडणार याकडे लक्ष देणाऱ्या निवडून आलेला उमेदवार याला विचार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाराजी दिसून येते. २०२० च्या निवडणुकीसाठी कालच आरक्षण सोडत जाहीर झाली कोल्हापूर मध्ये एकूण ८१ प्रभाग आहेत या सर्व प्रभागांसाठी वेगवेगळे आरक्षण काल जाहीर झाले बऱ्याच उमेदवारांना आनंद झाला तर बऱ्याच जणांमध्ये नाराजी दिसून आली भागांमध्ये आरक्षण वेगवेगळ्या पद्धतीने पकडले गेल्याने निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांना आता जोर लावावा लागणार आहे पक्ष कोणाला तिकीट देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे तरीही इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत काहींनी भागांमध्ये आधीच कामे केलेली आहेत मात्र या भागांमध्ये नवखा उमेदवार असेल त्यांना मात्र ही निवडणूक थोडीशी जड जाणार आहे त्यांना आपला प्रचार वेगाने करावा लागणार आहे नेतेमंडळींनी आधीच या निवडणुकीची मोर्चेबांधणी चालू केली होती आता केवळ उमेदवारांच्या मुलाखती उमेदवार निश्चिती होणे आवश्यक आहे आता जरी महा विकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये असली तरी कोल्हापूर महानगर मालिकेमध्ये हे चित्र राहीलच असे नाही बर्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढविली जाते त्यामुळे आता ही प्रत्येक पक्षाचा उमेदवार अशीच काहीशी निवडणूक होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एका भागांमध्ये भरपूर उमेदवार उभे राहण्याची दाट शक्यता आहे याचा विचारही पक्ष पातळीवर सुरू असून येणाऱ्या एप्रिल मध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवार तयारीला लागले असून आता पक्षीय पातळीवर याची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बीजेपी आणि ताराराणी आघाडी आणि अन्य पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे आरक्षण जाहीर झाले आणि बऱ्याच भागांमध्ये आनंदाचा गुलाल उधळला गेला फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली मात्र बऱ्याच भागांमध्ये वेगळे आरक्षण पडल्याने स्थानिक नगरसेवकांमध्ये नाराजी दिसून आली त्यामुळे बऱ्याच जणांनी यावर आक्षेप घेतला विरोध झाला मात्र तरीही सोडत पार पडली बरेच जण खुश आहेत बरेच जण नाखूष आहेत अशा या वातावरणात कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जोरदारपणे लढली जाणार आहे यात शंकाच नाही.२००५ आणि २०१० आणि २०१५ सालच्या निवडणुकीवर आधारित २०२० च्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे आरक्षण जरी पडले असले तरी तीच सोडत अखेरपर्यंत चालेल आणि ती सर्वांना मान्य करावी लागेल असेही बोलले जात आहे आरक्षण सोडत वर हरकती घेण्यासाठी ४ जानेवारीपर्यंत मुदत राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे मात्र या हरकतींवर विचार केला जाणार का त्या पद्धतीने बदल होणार का हे चार जानेवारी नंतरच कळणार आहे तूर्त तरी यनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आता तर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणे वाढदिवस साजरे करणे याला गती येणार आहे.