Monday, July 22, 2024
Home ताज्या १०० वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेल्या मे. रामचंद्र तवनाप्पा मूग यांच्याकडून आता फ्रॅंचाईजीच्या...

१०० वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेल्या मे. रामचंद्र तवनाप्पा मूग यांच्याकडून आता फ्रॅंचाईजीच्या माध्यमातून दिली जाणार ग्राहकांना सेवा

१०० वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेल्या मे. रामचंद्र तवनाप्पा मूग यांच्याकडून आता फ्रॅंचाईजीच्या माध्यमातून दिली जाणार ग्राहकांना सेवा

कोल्हापूर/प्रतिनिधी : विश्वास सार्थ आणि पारदर्शक व्यवहार यांच्या जोरावर गेल्या शंभर वर्षांपासून कोल्हापूरच्या मातीत रुजलेल्या मे. रामचंद्र तवनाप्पा मूग किराणा दुकानाने आपल्या व्यवसायात एक खास ब्रॅण्ड नावारूपाला आणला आहे ग्राहकांच्या मागणीनुसार शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्राहकांना सेवा
देण्यासाठी व्यवस्थापनाने विविध ठिकाणी फ्रॅंचाईजीच्या माध्यमातून आपला किराणा माल देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती राहुल महावीर मूग यांनी पत्रकार परिषदेत दिली. एक महिन्यापूर्वी रंकाळा येथे पहिल्या फ्रॅंचाईजीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहूनच आता जिल्हाभर याचा विस्तार केला जाणार असल्याचे राहुल मूग यांनी सांगितले आहे.
सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर आणि सर्वोत्तम तेच ग्राहकांना देण्याच्या ध्यासामुळे कोल्हापूर शहरापासून ते अमेरिकेत स्थायिक असलेल्या ग्राहकापर्यंत आमची सेवा पोचविण्याचे काम आम्ही पूर्ण करू शकलो असल्याचे यावेळी राहुल मूग यांनी सांगितले. कोल्हापूरसारख्या ठिकाणी किराणामाल दुकानाची फ्रॅंचाईजी देणारे आम्ही पहिले असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. केवळ ग्राहकांचे अतूट नाते आणि विश्वास यामुळेच हे शक्य झाले असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.कोल्हापूर येथे पापाची तिकटी या ठिकाणी छोटेखाणी व्यवसाय म्हणून या दुकानाची कै.श्री रामचंद्र तवनाप्पा मूग यांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. अल्पावधीतच मसाल्यासाठी नामांकित नाव म्हणून मिळालेली ग्राहकांची पसंती यामुळे हा व्यवसाय वाढू लागला पारदर्शक व्यवहार, अचूक वजन, आकारले जाणारे पैसे यामुळे ग्राहकांची अतूट नाते निर्माण झाले आणि काही वर्षांनी शिवाजी मार्केटमध्ये दुकान सुरू झाले प्रत्येक वर्षागणिक ग्राहकांची दृढ होणारे नाते नवीन काहीतरी करण्याची उमेद निर्माण करत होता आणि २००० साली त्या दुकानाला नवे रुप देण्यात आले चटणी मसाला आणि किराणामाल म्हटले की या दुकानाचेच नाव कोल्हापुरात रूढ झाले आहे. प्रत्येक पिढीचा विश्वास आम्ही जिंकल्यामुळे आज आमच्याही चार पिढ्यांशी नाते ग्राहकांचे जुळले आहे याचे समाधान आम्हाला असल्याचे राहुल मूग यांनी सांगितले.
कोरोनाच्या कालावधीमध्ये आमच्या किराणा दुकानाच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जाऊन ग्राहकांची सेवा दिली याबाबत ग्राहकांनी समाधान व्यक्त केले गेले आणि त्यामुळेच उपनगर व शहर ग्रामीण भागात आम्हाला आपली सेवा द्या अशी ग्राहकांच्यातून मागणी वाढल्याने आम्ही आता उपनगर आणि तालुक्याच्या ठिकाणी फ्रांचाईजी देण्याचा निर्णय घेतला असून आता मे. रामचंद्र तवनाप्पा मूग किराणामाल दुकानाचे जाळे आम्ही सर्वत्र निर्माण करणार असल्याचे राहुल मूग यांनी सांगून पुणे-मुंबई याठिकानीही आम्ही हळूहळू पोहोचणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.यावेळी शैलेश गद्रे, ज्ञानदेव पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments