Sunday, December 22, 2024
Home ताज्या गोकुळ’च्‍या कर्मचा-यांना आकर्षक पगारवाढ

गोकुळ’च्‍या कर्मचा-यांना आकर्षक पगारवाढ

‘गोकुळ’च्‍या कर्मचा-यांना आकर्षक पगारवाढ

कोल्‍हापूर/ता.१२/प्रतिनिधी : संघ व्‍यवस्‍थापन व कर्मचारी संघटना यांच्‍यातील १२ व्‍या ञैवार्षिक कराराची बैठक दि.११.१२.२०२०. इ रोजी संपन्‍न झाली. पगारवाढीच्‍या संदर्भाने व्‍यवस्‍थापन व कर्मचारी संघटना यांच्‍यातील खेळी-मेळीच्‍या चर्चेतून कर्मचा-यांना ९ कोटी ६० लाख इतकी भरीव पगारवाढ व्‍यवस्‍थापन मंडळाने दिली. सदरची पगारवाढ दि.३०.०६.२०२०. रोजी असणा-या २०४५ इतक्‍या कायम कर्मचा-यांना प्रत्येकी सरासरी रुपये ३९००/- इतकी झाली असून, सर्व कर्मचा-यांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण जगात कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर सर्वञ लॉकडाऊन असल्‍याने उद्योगधंदे अडचणीत आले असून, आर्थिक उलाढाल थांबली असतानासुद्धा गोकुळचे नेते आमदार श्री.पी.एन.पाटीलसाहेब व माजी आमदार श्री. महादेराव महाडिकसाहेब यांच्‍या नेतृत्‍वाखाली चेअरमन श्री.रविंद्र आपटे यांनी लॉकडाऊनच्‍या काळात सुयोग्‍य नियोजन करून ५ लाख दूध उत्‍पादक शेतकरी,कर्मचारी व ग्राहक यांच्‍यात समन्‍वय साधत अविरत दूध संकलन,प्रक्रिया व वितरण याचे चांगले नियोजन करून गोकुळचे आर्थिक चक्र गतिमान ठेवले.आठ महिन्‍यांच्‍या लॉकडाऊनमध्‍ये संपूर्ण जग थांबले असताना गोकुळचे कामकाज नियमीत ठेवण्‍यामध्‍ये सर्व संचालक मंडळ,कर्मचारी,वितरक व ग्राहक यांनी जिवाची बाजी लावून काम केले आहे त्‍यामुळेच लक्षावधी दूध उत्‍पादकांना कोरोनाच्‍या काळात कोणतीही आर्थिक झळ बसू न देण्‍याचा मोठा प्रयत्‍न संघ व्‍यवस्‍थापन व कर्मचारी यांनी केला आहे त्‍याचेच फळ म्‍हणून ही पगारवाढ म्हणण्‍यास  हरकत नाही.                      गोकुळचे चेअरमन श्री.रविंद्र आपटे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक श्री.अरुण नरके, श्री.रणजितसिंह पाटील,श्री.विश्‍वास पाटील(आबाजी), श्री.अरुण डोंगळे, संचालक श्री.विश्‍वास जाधव, श्री.पी.डी.धुंदरे, श्री.बाळासो खाडे, कार्यकारी संचालक श्री.डी.व्‍ही.घाणेकर यांनी बैठकीमध्‍ये संघटना प्रतिनिधींशी सौहार्दपुर्ण वातावरणात अत्‍यंत खेळी-मेळीत चर्चा केली.त्‍यामुळे व्‍यवस्‍थापनाने देवू केलेल्‍या पगारवाढीस संघटना प्रतिनिधींनी आनंदाने होकार देवून संचालक मंडळास   सन्‍मान दिला. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अध्‍यक्ष कॉ.एस.बी.पाटील,उपाध्‍यक्ष संजय सावंत, जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, शंकर पाटील, शाहीर निकम, व्‍ही.डी.पाटील, मल्‍हार पाटील, संभाजी देसाई, लक्ष्‍मण पाटील, संग्राम मगदूम यांनी गोकुळच्‍या हिताला बाधा न आणता दिलेली साथ हीच कराराची यशस्‍वीता आहे असे आभाराप्रत सांगितले. संचालक मंडळाच्‍या निर्णयास कर्मचारी संघटनेच्‍या पदाधिका-यांनी दिलेल्‍या मोलाच्‍या सहकार्याबद्दल चेअरमन श्री.रविंद्र आपटे यांनी धन्‍यवाद दिले.
यावेळी कार्यकारी संचालक श्री.डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी श्री.एस.एम.पाटील, व्‍यवस्‍थापक वित्‍त हिमांशू कापडीया, व्‍यवस्‍थापक प्रशासन श्री.डी.के.पाटील, सहा. व्‍यवस्‍थापक प्रशासन श्री.रामकृष्‍ण पाटील, व्‍यवस्‍थापक संगणक श्री.ए.एन.जोशी, बाजीराव राणे व जनसंपर्क अधिकारी श्री.पी.आर.पाटील आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments