मराठा समाज उद्या १४ रोजी मुंबईत धडकणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने एकत्र येऊन मूक मोर्चा काढला होता आणि शासनाला जाग आणली होती त्यावेळी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता पुन्हा मराठा आरक्षण स्थगित करण्यात आले आहे त्यामुळे तरुणांचे भवितव्य यामुळे अडचणीत आले आहे मुलांना शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना संपूर्ण फी भरावी लागणार असल्याने मराठा समाज पूर्णपणे अडचणीत आला आहे सध्या कोरोणाच्या वातावरणामुळे शाळा कॉलेज बंद आहेत मात्र इंजिनिअरिंग मेडिकल याशिवाय इतर शिक्षण घेणाऱ्या मुलांना आरक्षण असणे अत्यंत गरजेचे आहे ते जर नसेल तर भरमसाठ फी या मुलांना शिक्षणासाठी पालकांना भरावी लागणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे व सर्व ठिकाणीची नोकर भरण्यात येणाऱ्या भरती शासनाने रद्द कराव्यात या मागणीसाठी मुंबई येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशन यावर विविध ठिकाणाहून रॅलीने मराठा समाज एकवटून धडक मारणार आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उद्या मुंबईला पोहोचणार आहेत या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध केला जाणार आहे आणि सरकारने जर वेळीच याबाबत निर्णय दिला नाही तर मात्र संपूर्ण भारतभर मराठा समाज मोठ्या प्रमाणात उद्रेक निर्माण करेल असा इशारा समाजाच्या वतीने विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिला आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे असे बोलले जात आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये जर पोलिसांनी समाजाच्या कार्यकर्त्यांना अटकाव करून अटक केली तर याचा परिणाम उद्रेकात होईल असाही इशारा या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी दिला असून उद्या होणारा मोर्चा याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण घोषित करावे अन्यथा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडेल असा इशाराही या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला असल्याने मूक मोर्चा साठी संपूर्ण लोक रस्त्यावर उतरले होते. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या समाजाला पाठिंबा व्यक्त केला होता त्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता आणि त्यांची व्याप्ती वाढली होती आता मात्र हा समाज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही दिसून येत आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा यासाठी उद्या होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर सर्व ठिकाणचे मराठा बांधव एकत्र येणार आहेत आणि शासनाचा निषेध करणार आहेत कोल्हापुरातील ही जवळजवळ दोन ते तीनशे कार्यकर्ते उद्या मुंबईला जाणार असून आम्ही यावेळी राज्य शासनाचा निषेध करणार असल्याचे दिलीप पाटील व सचिन तोडकर यांनी सांगितले आहे जर तुम्हाला पोलिसांनी अटकाव केला तर मात्र याचा मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे मुंबईला उद्या जाताना कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते रॅलीने धडक मारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.