महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक व मंगलकार्यालयांनी कोव्हीड संदर्भातील आदेशाचे पालन करावे अन्यथा फौजदारी कारवाई – उपायुक्त निखिल मोरे
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक व मंगलकार्यालयांनी कोव्हीड-१९ च्या संदर्भातील आदेशाचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर तरतूदीनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल. असा इशारा उपायुक्त निखिल मोरे यांनी दिला आहे.महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक व मंगलकार्यालयांनी खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह/हॉटेल,घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी निर्गमीत केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास कोल्हापुर महानगरपालिकेकडुन परवानगी देण्यात येत आहे. शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन गर्दीचे कार्यक्रम आयोजित होत असल्याचे महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आले आहे. तरी खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह/हॉटेल यांनी महानगरपालिकेने दिलेल्या परवानगीमधील अटीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा भारतीय दंड संहीता १८६०(४५) यांच्या कलम १८८, आापत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही श्री मोरे यांनी स्पष्ट केले आहे.