Thursday, December 5, 2024
Home ताज्या एप्रिलपासून ५ कोटी ५१ लाखावर घरफाळा ऑनलाईन जमा १ डिसेंबरपासून २ टक्के...

एप्रिलपासून ५ कोटी ५१ लाखावर घरफाळा ऑनलाईन जमा १ डिसेंबरपासून २ टक्के दंडाची आकारणी सुरु – प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

एप्रिलपासून ५ कोटी ५१ लाखावर घरफाळा ऑनलाईन जमा
१ डिसेंबरपासून २ टक्के दंडाची आकारणी सुरु –  प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा ऑनलाईन भरण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून कोल्हापूर महानगरपालिकेकडे यावर्षी ५ कोटी ५१ लाख ६७ हजारांचा घरफाळा ऑनलाईन जमा झाला असल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
कोल्हापूर शहरवासीयांनी त्यांची घरफाळा आणि पाणीपट्टीची देय रक्कम महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात अथवा ऑनलाईनपध्दतीने भरुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करुन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२० या आठ महिन्यामध्ये शहरातील ५९८८९ मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्राकडे २८ कोटी ७६ लाख १४ हजार १३४ रुपयांचा घरफाळयाची रक्कम जमा झाली असून १६३७० मालमत्ताधारकांनी ऑनलाईनव्दारे ५ कोटी ५१ लाख ६७ हजार ८८६ रुपयांच्या घरफाळयाची रक्कम जमा केली आहे.
कोरोनामुळे महापालिकेवर आर्थिक ताण वाढला असून या परिस्थीतीत नागरिकांनी आपला देय असणारा घरफाळा आणि पाणीपट्टीची रक्कम तात्काळ भरुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करुन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, घरफाळयाच्या थकीत रक्कमेवर दिनांक १ डिसेंबर २०२० पासून २ टक्के दंडाची आकारणी सुरु करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या घरफाळयाची रक्कम तात्काळ भरुन जप्ती तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहनही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. घरफाळा वसुलीचे काम नियंत्रण अधिकारी तथा उपआयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखालीा सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गतीने सुरु ठेवले आहे.
महापालिकेची आर्थीक बाजू भक्कम करण्यासाठी नागरीकांनी आपले सर्व प्रकारचे कर तात्काळ ऑनलाईन अथवा नागरी सुविधा केंद्रामध्ये भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments