Wednesday, September 11, 2024
Home महाराष्ट्र एमएक्स एक्सकलुसिव्ह मनोरंजनाच अपग्रेड वर्जन "बायकोला हवं तरी काय" या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित  

एमएक्स एक्सकलुसिव्ह मनोरंजनाच अपग्रेड वर्जन “बायकोला हवं तरी काय” या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित  

एमएक्स एक्सकलुसिव्ह मनोरंजनाच अपग्रेड वर्जन “बायकोला हवं तरी काय” या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित

 
कोल्हापूर/प्रतिनिधी : पत्नीला आपल्या पतीमध्ये काय हवं असत? रुबाबदार दिसणाराअभिनेता, सिंघमसारखा पोलिस अधिकारी, शांतताप्रिय अध्यात्मिक गुरू किंवा दबदबा असणाऱ्या राजकारण्यासारखा कोणीतरी. आणि मग अशा अनेक गगनउंची गाठलेल्या अपेक्षांसह, प्रत्येक पत्नीला असे वाटते की देवाने तिच्याच पतीमध्ये हे सर्व गुणका नाही दिले अशीच एमएक्स प्लेयर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले  ओरिजनल “बायकोला हवं तरी काय” ही एक विनोद आणि
मनोरंजनाने परिपूर्ण वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. एक सामान्य गृहिणी (श्रेया बुगडे)आपल्या भक्तीने श्रीकृष्णाला (निखिल रत्नपारखी) प्रसन्न करते आणि त्या बदल्यात परमेश्वराकडे तिच्या नवऱ्याला, तिच्या नजरेतल्या सर्वोत्कृष्ट जीवन साथीच्या प्रतिमेनुसार अपग्रेड करायची मागणी करते, हे वेबसिरीजच्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळतंय.
प्रियदर्शन जाधव याने या ६ भागांच्या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शकाची धुरा सांभाळली असून तो वेबसिरीजबद्दल सांगताना म्हणाला, “प्रत्येकाला आयुष्यात आपण अपग्रेड व्हायला हवं असं नेहमीच वाटते. नवीन गाडीमध्ये
अपग्रेड करावा अस वाटते, मोठे घर घेऊन अपग्रेड व्हावं असे  वाटते… पण काय होतं जेव्हा आपण आपल्या साथीदाराला “अपग्रेड” करायला जातो? या कथेतून  हाच हास्यवर्धक, मनोरंजनाचा कल्लोळ श्रेया, अनिकेत आणि निखिलच्या परफेक्ट टायमिंगसह गोड संदेश देत आपल्या भेटीला येत आहे आणि मला अशी आशा आहे की, प्रेक्षकांना सिरीज पाहताना ही तितकाच आनंद मिळेल.
श्रेया बुगडे पुढे म्हणाली, “माझे पात्र एका साध्या गृहिणीचे आहे जिला  आपल्या पतीसाठी आणि स्वतःसाठी सर्वात चांगले असे सगळं हवं असण्याची इच्छा आहे. मी सीरिजबद्दल एवढेच सांगू शकते की प्रत्येक वेळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण तथास्तु म्हणतात तेव्हा नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील आणि मी याचीहमी देते की या सर्व गोष्टींच्या शेवटी स्वतः भगवान श्री कृष्णालाही प्रश्न पडेल नक्की ‘बायकोला हवं तरी काय’.एमएक्स प्लेयरने अनेक वेगवेगळ्या विषयांच्या कलाकृतीचा
नजराणा देत, समांतर आणि काय हवं, पांडू आणि इडियट बॉक्स सारख्या बहुशैलीतील मराठीवेब सीरिजद्वारे प्रेक्षकांना आजवर आकर्षित केले आहे.”बायकोला हवं तरी काय” या नवीन सिरीजच्या स्वरूपात हास्य आणि मनोरंजनाची पर्वणी सुरू होतेय ४डिसेंबरपासून एम एक्स प्लेयरवर.  या सिरीजचे सर्व भाग
विनामूल्य पाहता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments