Thursday, November 21, 2024
Home ताज्या शहीद संग्राम पाटील यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील मावळलेले हास्य परत फुलू दे -...

शहीद संग्राम पाटील यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील मावळलेले हास्य परत फुलू दे – नवीद मुश्रीफ यांची प्रार्थना हुतात्मा संग्राम पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नासाठी दोन लाखांची आर्थिक मदत

शहीद संग्राम पाटील यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील मावळलेले हास्य परत फुलू दे –
नवीद मुश्रीफ यांची प्रार्थना हुतात्मा संग्राम पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नासाठी दोन लाखांची आर्थिक मदत

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत मातेच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावून शहीद संग्राम पाटील हसत- हसत हुतात्मा झाले. पित्याची छत्रछाया हरपलेल्या त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील गेलेलं हास्य पुन्हा फुलू दे, अशी प्रार्थना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केली. शहीद जवान कै. पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी श्री. मुश्रीफ यांनी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने या कुटुंबाला दोन लाखांची आर्थिक मदत दिली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.
निगवे खालसा ता. करवीर येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घरी भेटून श्री. नवीद मुश्रीफ यांनी ही मदत दिली. वडील शिवाजी रामचंद्र पाटील, आई सौ. सावित्री, मुलगा कु. शौर्य, मुलगी कु शिवश्री, भाऊ संदीप व कुटुंबीयांसह ग्रामस्थ उपस्थित होते.१२ दिवसांपूर्वी शहीद झालेल्या कै. पाटील यांच्या गावी मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन त्यांनी शहीद कै. पाटील यांच्या अर्धवट घराचे स्वप्न पूर्ण करू, असे जाहीर केले होते.
यावेळी पुढे बोलताना नवीद मुश्रीफ म्हणाले, सात वर्षांचा मुलगा खुश शौर्य व दोन वर्षांची मुलगी शिवश्री यांचे वडिलांच्या छत्रछायेत हसत- खेळत जगायचं, आनंदाने बागडायचं हे वय. त्या वयातच त्यांच्या मुलांवर वडीलांना मुखाग्नी देण्याची दुर्दैवी वेळ आली. शहीद श्री. पाटील यांचे देशासाठीचे बलिदान पिढ्यान- पिढ्या आठवणीत ठेवून आपण सर्व समाज त्यांच्या  कुटुंबीयांची छत्रछाया बनून खंबीरपणे पाठीशी राहूया.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले,  जवान संग्राम पाटील शहीद झाल्याचे समजतात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने निगवे खालसा येथे भेट दिली.  त्यांनी शहीद पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या बांधकामासाठी अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे तात्काळ त्याची अंमलबजावणी करीत आज रकमेचा धनादेश कुटुंबीयांच्या हवाली केला. मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शहीद जवानांना मदत दिली असून त्यांचा हा उपक्रम समाजाला दिशादर्शक असाच आहे.
यावेळी करवीर पंचायत समितीचे उपसभापती सागर पाटील, बिद्री साखरचे संचालक श्रीपती पाटील, जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, उपसरपंच अशोक किल्लेदार, दत्ता पाटील- केनवडेकर, डॉ. टि. वाय. पाटील, एल. एस. किल्लेदार, शहाजी किल्लेदार, माजी सभापती संजय गुरव, माजी पंचायत समिती सदस्य विलास कांजर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट…….
पाटील कुटुंबाच्या पाठीशी…….
आज शहीद जवान संग्राम पाटील यांचे उत्तरकार्य होते. त्यांच्या दोन्ही लहान मुलांना पाहून उपस्थित गहिवरत होते. या लहान मुलांसह  पाटील कुटुंबियांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments