Friday, January 17, 2025
Home ताज्या डीकेएएसस्सी काॅलेजच्या कलाशाखेचा स्नेहमेळावा उत्साहात

डीकेएएसस्सी काॅलेजच्या कलाशाखेचा स्नेहमेळावा उत्साहात

डीकेएएसस्सी काॅलेजच्या कलाशाखेचा स्नेहमेळावा उत्साहात

इचलकरंजी/प्रतिनिधी : महाविद्यालयीन काळ हा अविस्मरणीय असतो,आपले करियर घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगून जीवनात यशस्वी ठरलेल्या सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आम्हां गुरूजनांना अभिमान वाटतो असे गौरवोद्गार दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स अँन्ड काॅमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर.आर.कुंभार यांनी काढले.ते १९९४ ते १९९८ सालातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिंनीच्या स्नेहमेळाव्यात बोलत होते.
महाविद्यालयाने घडविलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळच्या शिक्षकांची आठवण ठेवली त्यातून संस्थेचे ज्ञान,विज्ञान व सुसंस्काराचे ध्येयपुर्ती झाल्याचे सांगून आपल्या काॅलेजमध्ये एमएसस्सी विभाग सुरू करायचे असून त्यास माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे प्राचार्य श्री.कुंभार यांनी अपेक्षा  व्यक्त केल्या.स्नेहमेळाव्याच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व पुज्य बापुजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर वृक्षारोपन करण्यात आले.दुसर्या सत्रात ड्रिम्स हाॅलिडे रिसाॅर्ट,संगमनगर येथे मुख्य स्नेहमेळावा संपन्न झाला.प्रथम प्राचार्य श्री,कुंभार व सर्व माजी प्राध्यापक व प्राध्यापिकांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये मल्लाप्पा सुरपुसे,श्री.कोतवाल ,शैलजा  चनगुंडी,            श्री.कोरे,श्री.मोरे,एम.एम.कांबळे,श्री.वीरकर यांचा सत्कार करण्यात आला.शिक्षकांनी मनोगतात शुभाशिर्वाद व्यक्त  केले.यावेळी पुरुषोत्तम परीट,रविंद्र माने,संजय केंगार,नंदकुमार गाडेकर, अमर पाटील,सुरेश भोंगाळे,शुभांगी कोकाटे,अपर्णा कुलकर्णी,राजश्री भागवत,प्रमोद परीट, माधवी लोहार,स्वाती पाटील,जयश्री कुलकर्णी आदी माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी स्नेहमेळाव्याविषयी आपले मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासीन चौगुले,प्रास्ताविक बसवराज कोटगी यांनी तर स्वागत अमर नवाळे यांनी केले.कार्यक्रमात उपस्थितांचे आभार अजय व्हनुगरे यांनी मानले.कार्यक्रमास पराग सुर्वे, महावीर टारे,असिफ कोतवाल, सर्जेराव पडियार ,प्रदीप दरिबे, गिता पुजारी,मानिक हुल्ले,सुनिता भगाचे, मनिषा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments