Sunday, July 14, 2024
Home ताज्या जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उंचावेल - सतेज पाटील...

जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उंचावेल – सतेज पाटील     

जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उंचावेल – सतेज पाटील     

कागल/प्रतिनिधी : जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उंचावेल, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.सतेज पाटील
मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर व पुणे पदवीधर कागलमध्ये शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर व पदवीधर मतदार संघाचे अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार संजय घाटगे, उमेदवार जयंत आसगांवकर, भैय्या माने, बाबा पाटील,भरत रसाळे, दादा लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाषणात मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात वेगवेगवे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व असावे. शिक्षकांचे व पदवीधरांचे प्रश्न सोडविणारे सक्षम उमेदवार महाविकास आघाडीने दिले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी करणारा असा जयंत आसगांवकर यांच्यासारखा आमदार असावा. यासाठी महाविकास आघाडीच्या कर्तत्ववान उमेदवारांना निवडून द्यावा. शिक्षकांचे व पदवीधरांचे लिड कागलमधून मिळेल. कागल तालुका विजयाचा शिल्पकार असेल.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीचे दोन्ही उमदेवार शिक्षण व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. पक्षाच्यावतीने उमेदवार आहेत. कोरोना नियंत्रणासाठी प्रचंड निधी लागला. या काळात उत्पन्नाचे स्रोत थांबले असताना शिक्षकांचे वेतन थांबविले नाहीत. निसर्ग चक्रीवादळासारखे संकट आले. दुसरी कोरोनाची लाट आली नाही तर विकास कामाला गती येईल. भाजपाच्या काळात न सुटलेले शिक्षकांचे प्रश्न निश्चितपणे सोडवू. विरोधी पक्षाने सरकार अडचणीत आणण्याचा सतत प्रयत्न केला. पदभरतीची स्थगिती उठल्यावर २३ हजार नोकरभरती करून पदवीधरांचे प्रश्न सुटतील. नियतीला भाजपचे सरकार यावे असे वाटत होते म्हणून आमचे सरकार आले. मिळालेल्या संधींचे सोने करूया.
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, आसगांवकर सरांना शिक्षकांच्या प्रश्नांची चांगली जाणीव आहे. अरूण लाड हे कर्तबगार आहेत. वीज दरवाढीच्या आंदोलनात ते सहभागी होते. पदवीधरांचे प्रश्न सोडवतील यात शंकाच नाही. नवा भारत घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे. प्रा.जयंत आसगांवकर म्हणाले, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी मी उमेदवार आहे. यापूर्वी च्या आमदारांनी प्रश्न सोडवायला पाहिजे होते. मात्र निर्णय न झाल्यामुळे ते सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यावेळी दादा लाड, खंडेराव जगदाळे, विलास पोवार, शिवाजीराव चौगुले, भैय्या माने, राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमास एस.डी. लाड, राजू माने, शानाजी माने, सभापती पूनम मगदूम महाडिक, राजश्री माने, अशोक बुगडे, जी.एस. पाटील, बाबासाहेब चौगुले, एम.आर. चौगुले, एन.एस. पाटील, जीवनराव सावंत आदींसह कार्यकर्ते उपस्थित आहे. सुत्रसंचलन के.आर पाटील यांनी केले. आभार किरण पास्ते यांनी मानले.

चौकट………
बंटी पाटील म्हणाले, मतदार तीस सेकंदात बाहेर आला तर मतदाराने आपल्याला मतदान केले असे समजावे. मतदानानंतर लगेच समजेल. किती मते मिळाली.राजकारण शिकयासाठी कागल कागलच्या विद्यापीठाचे मार्गदर्शन आम्ही घेतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments