Thursday, November 21, 2024
Home ताज्या केशवराव भोसले नाट्यगृहासाठी काँग्रेसच्या खासदार, आमदारांकडून ५ कोटींचा निधी आमदार सतेज पाटील...

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी काँग्रेसच्या खासदार, आमदारांकडून ५ कोटींचा निधी आमदार सतेज पाटील यांची माहिती

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी काँग्रेसच्या खासदार, आमदारांकडून ५ कोटींचा निधी आमदार सतेज पाटील यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या पुर्नबांधणीसाठी कोल्हापुरातील काँग्रेसच्या खासदार, आमदार यांच्याकडून ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी कॉंग्रेसच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही कॉंग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज डी पाटील यांनी दिली.आमदार सतेज पाटील म्हणाले, संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूर नगरीचे भूषण असून सांस्कृतिक चळवळीचे महत्वाचे केंद्र आहे. त्यामुळे ही वास्तू पुन्हा नव्याने उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आपल्या आमदार निधीतून दीड कोटी, खासदार शाहू महाराज आणि आमदार जयंत आसगावकर यांनी प्रत्येकी १ कोटी, आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी प्रत्येकी ७५ लाख रुपये असा एकूण ५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे जिल्हा नियोजन समितीला पत्र दिले आहे.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी १९१५ रोजी उभारलेला हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा नव्या दिमाखात उभा राहावा यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील. मराठी चित्रपट, संगीत आणि नाट्य सृष्टीत योगदान देणारे अनेक ख्यातनाम कलाकार या नाट्यगृहातून घडले आहेत. कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments