केशवराव भोसले नाट्यगृह आता उरल्या केवळ आठवणी
कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर : अनेक नाटकांची साक्ष, अनेक कार्यक्रम सादर करण्यास उत्तेजीत केलेला आणि कलाकारांना ऊर्जा दिलेला अनेकांचे पाय ज्या ग्रहाला लागले ते ग्रह म्हणजेच केशव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा जो जतन करणे आवश्यक होते ते गुरुवारी रात्री आगीच्या भक्षस्थानी,आगीच्या लपेटात सापडले आणि कोल्हापूरची शान असलेले हे केशवराव भोसले नाट्यगृह जमीन दोस्त झाले,आगीच्या ज्वाळांनी या नाट्यगृहाला जमीनदोस्त होण्यास भाग पाडले.आता केवळ या ठिकाणी आठवणी आणि जनतेच्या भावना उरल्या असून आगीने हे नाट्यगृह नाहीसे झाले आहे. गुरुवारी ८ ऑगस्ट २०२४ या दिवशी हे नाट्यगृह आगीच्या विळख्यात सापडले आणि ते स्वतःला सोडू शकले नाही सकाळपर्यंत हे नाट्यगृह होत्याचे नव्हते होऊन बसले होते ज्या शाहू महाराजांनी अनेक कलाकारांचा नाट्यकर्मींचा विचार करून या नाट्यगृहाची १९१५ साली निर्मिती केली हे नाट्यगृह आज बघता बघता आगीचा तडाख्यात सापडून नष्ट झाले आहे. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अनेक दातृत्व लोक जनता नेते मंडळी पुढे येऊन या नाट्यगृहाची उभारणी करतील मात्र या नाट्यग्रहांसोबत नाटककार संगीतकार गीतकार शालेय विद्यार्थी कोल्हापूरकर या सर्वांच्या आठवणी पुन्हा येऊ शकणार आहेत का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही कालची ही घटना कोल्हापूरच्या दृष्टीने काळ रात्र ठरली हा काळा दिवस कोल्हापूरला एका ऐतिहासिक वास्तूचा ठेवा जतन करू शकलो नाही याची मनामध्ये खंत मात्र कायम राहणार आहे.हे केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूर शहरातील एक विख्यात नाट्यगृह होते. हे नाट्यगृह कोल्हापुरातील खासबाग भागात वसले आहे. थिएटरची मालकी सार्वजनिक असून व्यवस्था कोल्हापूर महापालिका पाहते. या नाट्यगृहाचे उद्घाटन १४ ऑक्टोबर १९१५ या दिवशी झाले आणि नूतनीकरण ९ मे १९८४ ला झाले होते.प्रेक्षागृहाचे आकारमान ७७’ x ४८’ इतके असून रंगमंचाचे २५’ x ३३’ आहे. रंगमंचासमोरचा मोठा दर्शनी पडदा जांभळ्या रंगाच्या मखमली कापडाचा आहे. तो ४४’ x १६’ या आकारमानाचा आहे. नाट्यगृह वातानुकूलित आहे. त्याची आसनसंख्या तळमजल्यावर ६४५ खुर्च्या आणि सज्ज्यामध्ये ३०७ खुर्च्या इतकी आहे.अशा या नाट्यगृहाने अनेक कलाकार घडवले या मातीत रुजवले नावारूपाला आणले या सर्वांनाच हा रंगमंच आगीच्या तांडवात सापडला होता हे दुःख मनाला न पटणारे असे वाटत होते. मात्र तसे घडले नाही कारण आगी मध्ये हे नाट्यगृह जळाले ही घटना खरी होती ती वाऱ्यासाठी पसरली आणि देशभरातील कोल्हापूरकरांच्या भावना दुखावल्या मन हेलावले, डोळ्यात अश्रू आले आणि कोल्हापूर साठी एक आठवण असलेला हा ऐतिहासिक असा नाट्यगृहाचा ठेवा बघता बघता आगीच्या भक्षस्थानी सापडला.कोल्हापूरकरांचे मन हे लावले अश्रूंचा बांध याठिकाणी फुटला आणि बघता बघता चांगल्या पद्धतीने उभा असलेला नाट्यगृह जमीन दोस्त झाला. अनेकांच्या आठवणी या नाट्यगृहाला लागलेल्या ज्वाळा बघून ताज्या झाल्या आणि त्यांनी अश्रूंना वाट करून दिली डोळ्यात देखत उभा पेटलेले हे नाट्यगृह कोणीही वाचू शकले नाही.