Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याघोडावत विद्यापीठात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे यशस्वी आयोजन

घोडावत विद्यापीठात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे यशस्वी आयोजन

घोडावत विद्यापीठात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे यशस्वी आयोजन

जयसिंगपूर/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इंटरनल क्वालिटी अॅश्युरन्स सेल (IQAC) च्या वतीने “लर्नर सेंट्रिक ऑनलाइन कोर्स डेव्हलपमेंट” या पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे (FDP) यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचा उद्देश, येथील प्राध्यापकांनी प्रभावी ऑनलाइन शिक्षणासाठी आशय निर्मिती, कौशल्य व ज्ञान आत्मसात करणे हा होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.उद्धव भोसले म्हणाले की आधुनिक शिक्षणासाठी ऑनलाइन अभ्यासक्रमाची आशय निर्मिती करणे गरजेचे आहे. यासाठी युजीसी ऑनलाइन अभ्यासक्रमाला महत्त्व देत आहे. त्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांनी ऑनलाइन आशय निर्मितीवर भर द्यावा.
एफडीपी प्रशिक्षणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन, नवी दिल्ली येथील प्रा. के. श्रीनिवास, डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे डॉ. विनय कुलकर्णी, चंदिगड विद्यापीठ,मोहालीचे कुलगुरू डॉ. मनप्रीत सिंग मन्ना आणि स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस, नांदेड विद्यापीठाचे डॉ. सुरेंद्र रेड्डी अशा नामवंत तज्ञांनी विविध अध्यापन साधनांचा वापर करून प्राध्यापकांना कृती सत्रा द्वारे प्रशिक्षण दिले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार यूजीसी द्वारे विद्यार्थ्यांना मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस (MOOCs) करणे आवश्यक आहे. त्यासाठी घोडावत विद्यापीठातील प्राध्यापक या कार्यशाळेद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारा अभ्यासक्रम व ऑनलाईन कोर्सेस तयार करणार आहेत.
या कार्यशाळेचे आयोजन आय क्यू ए सी च्या संचालक डॉ. रेवती देशपांडे यांनी केले. तर प्रा. नीलेश सबनीस, प्रा.श्रीशैल सलगरे, प्रा.विद्याराणी खोत यांनी सहाय्य केले.विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, अकॅडमी डीन डॉ.व्ही.व्ही कुलकर्णी आणि सर्व विद्याशाखांचे अधिष्ठता यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments