ङाॅ. आशा शितोळे यांचा सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : जायंट्स गृप ऑफ कोल्हापूर मेट्रो आणि जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये डाॅ आशा शितोळे यांनी ‘ आपली सावली’ स्व लिखित काव्य वाचन केले .तसेच जायंट्स मध्ये त्यानी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्या जायंट्स गृप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थ ग्रुपच्या फांउंडर आहेत तसेच त्या कांउसील सदस्यही आहेत. त्यांच्यावर फेडरेशन २ क २०२३ साला करीता वैद्यकीय उपक्रमाच्या कामकाजाची जबाबदारी होती. ती त्यानी उत्तम प्रकारे पार पाडली. त्याबदल ही त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळेस मेट्रो ग्रुपचे फांउंडर आणि माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव यादव, तोरस्कर,युनिट डायरेक्टर सुरेश खांडेकर, आणि कवि संमेलनातील जेष्ठ कवि उपस्थित होते.