Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याराजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी याच्या एनबीए मानांकनात केआयटीचे मोलाचे...

राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी याच्या एनबीए मानांकनात केआयटीचे मोलाचे सहकार्य

राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी याच्या एनबीए मानांकनात केआयटीचे मोलाचे सहकार्य

केआयटीच्या ‘एआयसीटीई मार्गदर्शन’ समितीचे यश
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूरला ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE), नवी दिल्ली कडून “मार्गदर्शन” या उपक्रमांतर्गत “मेंटोर इन्स्टिट्यूट” म्हणून एकूण ३५ लाख इतका निधी प्राप्त झाला होता. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि बेळगावी येथील एकूण ०७ इंजिनिअरिंग तसेच पॉलिटेक्निक महाविद्यालयांचा समावेश “मेन्टी बेनेफिशिरी इन्स्टिट्युट” म्हणून करण्यात आलेला आहे. या महाविद्यालयांमधील विविध विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन (एनबीए), नवी दिल्ली कडून मानांकन मिळविण्याच्या दृष्टीने केआयटी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करते व विविध उपक्रम राबवते.
केआयटीच्या मार्गदर्शन समिती ने आजवर या महाविद्यालयांमध्ये एनबीए मानांकन प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता पडताळणी, त्याचे निकष व परिमाणांचे मूल्यांकन या विषयांवर ९० हून अधिक उपक्रम व कार्यशाळांचे आयोजन करून तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले आहे. सध्या एकूण ०७ मेन्टी बेनेफिशिरी इन्स्टिट्युटपैकी ०३ महाविद्यालयांनी त्यांचा विविध विभागांचा एनबीएचा स्वयं – मूल्यांकन अहवाल हा सादर केला आहे.
या उपक्रमांच्या प्रयत्नातून  देवरूख, रत्नागिरी येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अंबव या मेन्टी बेनेफिशिरी इन्स्टिट्युटच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागास नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन (एनबीए), नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेकडून २०२३-२४ ते २०२५-२६ या पुढील तीन शैक्षणिक वर्षांसाठी एनबीएचे  मानांकन मिळाले. हे केआयटी – एआयसीटीई मार्गदर्शन समितीचे पाहिले यश असल्याचे केआयटी चे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी नमूद केले व इतर महाविद्यालयांच्या तयारी बद्दलची माहिती दिली.
या समिती मध्ये केआयटीचे कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जिंन्नी, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट डॉ. शिवलिंग पिसे, डीन अकॅडमीक डॉ. अक्षय थोरवत, डीन क्वालिटी अस्स्युरंस डॉ. प्रशांत पोवार, असोसिएट डीन अकॅडमीक प्रा. सौ. दिपाली जाधव, मार्गदर्शन समितीचे समन्वयक प्रा. मिहिर कुलकर्णी यांचा समावेश आहे. केआयटीचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. साजिद हुदली , सचिव श्री. दिपक चौगुले यांनी सदरच्या यशाबद्दल केआयटी – एआयसीटीई मार्गदर्शन समिती, राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अंबवचे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य डॉ. महेश भागवत व मेकॅनिकल इजिनीअरिंग विभागप्रमुख डॉ. सचिन वाघमारे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments