नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी भवानी मातेची धान्याच्या राशीतील खडी पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी भवानी मंडप जुना राजवाडा मंदिरातील भवानी देवी तुळजाभवानीची धान्याच्या राशीतील खडी पूजा बांधण्यात आली होती. पूजा बांधताना भाताच्या लोंब्या, गुळाची ढेप, गहू ,ज्वारी, यासह धान्य आणि डाळींच्या राशी मांडण्यात आल्या होत्या. मंदिराचे पुजारी बाळासाहेब दादर्ने, अमर जुगार, सारंग दादर्ने ,विजय बनकर यांनी पूजा बांधली.
तुळजसभवांनी मंदिर सजविण्यात आले आहे. सकाळी श्रीमंत युवराज संभाजी राजे, संयोगिताराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. त्यांचे स्वागत छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अँड. राजेंद्र चव्हाण यांनी केले. यावेळी ट्रस्टचे ट्रस्टी प्रसन्न मोहिते, प्रणील इंगळे, जयाजी गायकवाड आदी उपस्थित होते.पहिल्याच दिवशी देवीच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.