भारतीय इतिहास संकलन समितिचे इतिहास परिषद संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेच्या माध्यमातून भारताच्या विविध प्रांतातील इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनलेखन करण्याची संकल्पना अंमलात आणली जाते. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक प्रांतात एक स्वतंत्र संघटन तयार करण्यात आले, आणि त्याला इतिहास संकलन समिती असे संबोधन देण्यात आले. कोल्हापूरच्या इतिहासाचा व्यापक अभ्यास करण्यासाठी इतिहास संकलन समिती कोल्हापूरची स्थापना दिनांक २३ डिसेबर २००८ रोजी मा. हरिभाऊ वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. अर्थात यापूर्वीपासूनच या दिशेने कोल्हापूरात काम सुरु झालेले होतेच. ज्येष्ठ प्रचारक के राजाभाउ भोसले यांच्या पुढाकारातून आणि श्री भा. शि. इंदुलकर, श्री जगदीश धर्माधिकारी, सी पेठे, विद्याधर कुलकर्णी या ज्येष्ठ मंडळींनी या कार्याची मुहुर्तमेढ तीन चार वर्षापूर्वीच रोवली होती थी राजाभाउंच्या निधनानंतर कार्याची गती मंदावली. डॉ. आनंद दामले यांच्याकडे कोल्हापूर समितीच्या पुनर्गठनायी जबाबदारी सोपविण्यात आली. वामले सरांनी कुशलतापूर्वक अनेक नवीन कार्यकर्ते एकत्र केले आणि काही बैठका झाल्यानंतर अधिकृतपणे समिती स्थापन झाली.
अध्यक्ष प्रि अमरसिंह राणे सर, उपाध्यक्ष डॉ. बी.डी. खणे, सचिव डॉ. आनंद दामले. सहसचिव उमाकांत राणिगा, सहसचिव प्रसन्न मालेकर या प्रमुख कार्यकारिणी बरोबरच डॉ. आरेन हर्डीकर. प्रा. लक्ष्मणराव खोत, श्री अ.व. करवीरकर, डॉ. अमर आडके, प्रा.अ.रा. जयतीर्थ, श्री शशीकांत सोळांकुरकर अशी सर्व क्षेत्रातील मंडळी समितीत येत गेली. महिला वर्गातूनपण चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. सुप्रिया जोशी, श्रीमती अरुणा देशपांडे. डॉ. नीला जोशी, सी वैशाली गोखले अशा मान्यवर विदुषी समितीला जोडल्या गेल्या. एक उत्तम संघटन तयार झाले.
पैठण आणि नासिक या प्राचीन शहरांच्या इतिहासाचा अभ्यास, चर्चासत्र, संपादन आणि ग्रंथप्रकाशन या क्रमाने अखिल भारतीय पातळीवरील संकल्पानुसार काम झालेले होते. आता कोल्हापूच्या इतिहासग्रंथाची सिद्धता करण्याची जबाबदारी कोल्हापूर समितीने स्वीकारली. विषय निश्चिती. त्या त्या विषयावरील तज्ञ अभ्यासकांचा शोध घेणे, आर्थिक नियोजन, चर्चासत्राची रचना व पूर्वतयारी या सर्व बाबी समितीने समर्थपणे पेलल्या, कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आदरणीय डॉ. गो.वं देगलूरकर सरांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसाचे राज्य पातळीवरील चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न झाले. दि.९.१०, व ११ ऑक्टोबर २००९ या तीन दिवस चाललेल्या चर्चासत्राला अभूतपूर्व यश मिळाले. सोबतच कोल्हापूरातील ज्येष्ठ चित्रकार रविंद्र मेस्त्री यांनी चितारलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित चित्रकृतीचे आणि श्री शशिकांत सोळांकुरकर याच्या संग्रहातील दुर्मिळ प्राचीन नाण्यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले.
चर्चासत्राच्या यशानंतर ग्रंथसिद्धतेची तयारी जोरात सुरु झाली. चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक मान्यवर अभ्यासक आणि विद्वान मंडळी समितीशी जोडली गेली. सर्वाच्या अथक परिश्रमातून ‘युगयुगीन करवीर, इतिहासदर्शन’ हा ग्रंथ दि.३१ ऑक्टोबर २०१० या दिवशी मोठ्या दिमाखात प्रकाशित झाला. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षपदी करवीरचे छत्रपती श्रीमंत शाहु महाराज आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे. पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभासाठीडॉ. देगलूरकर सर, डॉ. चिं. ना. परचुरे, श्री विजय कुवळेकर यासारख्या मान्यवरांचा सहभाग कार्यक्रमाची उंची वाढविणारा ठरला. सुमारे ४०० पृष्ठसंख्या असलेल्या या संदर्भग्रंथाचे प्रकाशनपूर्व नोंदणीमुल्य रु /१०० इतके नाममात्र ठेवल्यामुळे अल्पावधीतच सर्व आवृतीचे वितरण पूर्ण झाले. इतिहासप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे या संथाची दुसरी आवृती प्रकाशित करण्याचा योग आला. त्यावेळी काही नवीन विषयांवरील लेखांचा समावेश करून दि.८ फेब्रुवारी २०१४ या दिवशी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांच्याच अध्यक्षतेखाली महामहीम पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (राज्यपाल, बिहार) यांच्या शुभहस्ते आणि डॉ.बी.एम. हिंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसरी आवृती प्रकाशित झाली. अल्पावधीतच या आवृत्तीच्या १००० प्रतीपण संपल्या. समितीच्या एकजुटीचे आणि परिश्रमाचे हे उत्तम उदाहरण ठरले. इतकेच नव्हे तर हा ग्रंथ अनेक ठिकाणी संदर्भग्रंथ म्हणून उपयोगात आणला गेला, या यशामुळे समितीचा आत्मविश्वास वाढण्यास मोठीच मदत झाली.
याबरोबरच समितीच्या वतीने इतिहासाशी संबंधित व्याख्यानांचे पण वेळोवेळी नियोजन करण्यात आले. दि १२ एप्रिल या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वसंतराव मोरे सरांचे ‘पानपतचा रणसंग्राम, एक तेजस्वी शौर्यगाथा’ या विषयावर व्याख्यान झाले. मान. श्री हरिभाउ वझे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या समितीचे