Thursday, November 21, 2024
Home ताज्या गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी च्या वतीने 'ती...

गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी च्या वतीने ‘ती ‘ गाण्याचा कार्यक्रम

गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी च्या वतीने ‘ती ‘ गाण्याचा कार्यक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : जगभरातील गरजू व्यक्तींसाठी सातत्याने गेली ११९ वर्षे कार्यरत असलेल्या रोटरी इंटरनॅशनल या जगप्रसिद्ध संस्थेचा “रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर,’ हा कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील लोकांच्या उन्नतीसाठी काम करणारा क्लब आहे. महिला, लहान मुले आणि वृद्ध यांच्या शारीरिक, मानसिक समस्या, विद्यार्थ्यांच्या गरजा, निसर्गाची हानी कमीत कमी व्हावी याची काळजी, परिसर स्वच्छता, प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा रिसायकलिंग आणि असे इतर अनेक उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो.
यासाठी आम्ही स्वतः सर्व खर्च करतोच पण कोल्हापूरसारख्या दातृत्वावान लोकांनी भरलेल्या नगरीतून आम्हाला सतत मदतीचा हात सुद्धा मिळत असतो.
काही मोठ्या उपक्रमांसाठी आम्ही निधी जमा करत आहोत, आणि यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे. अर्थात ही मदत घेताना पैश्यांचा योग्य विनियोग केला जाईल याची काळजी घेतली जाईल. यासाठीच अनोख्या अश्या “ती” नावाच्या गाण्याच्या मैफिलीचे अयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दि. १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता, आनंद भवन, सायबर कॉलेज, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती प्रोजेक्ट चेअरमन रोटरियन वारणा वडगावकर आणि को – चेअरमन रोटरीयन राजेंद्र जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनांमुळे स्थानिक कलाकारांना वाव मिळेल, तसेच गरजूंना मदतीचा हात मिळेल. यातून मिळणारा सर्व निधी हा सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस रोटेरियन पुरुषोत्तम खटवानी, रोटेरियन बाबा जांभळे, प्रसाद जमदग्नी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments