लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा
कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी संधी दिली जात नाही सरकारी संस्थांच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवली जात आहेत हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्त्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची ५०% ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे. इंडिया आघाडीही मर्यादा हटवेल आणि लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली.
हॉटेल सयाजी येथे राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, आज कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे ठोसपणे सांगता येत नाही. परंतु जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे .जात निहाय जनगणना म्हणजे एक्सराच आहे एक्स-रे काढल्यानंतर समस्या काय आहे ते समजून येईल व नंतर त्यावर उपाय करता येईल पण जात निहाय
जनगणनेला भाजप ,आरएसएसचा विरोध आहे देशातील ९० टक्के जनतेला खरी माहिती कळू नये यासाठी ते विरोध करत आहेत. परंतु लोकांच्या हितासाठी जातनिहाय जनगणना लोकसभा व राज्यसभेत आपण मंजूर करून घेऊ यासाठी कुठलीही शक्ती रोखू शकणार नाही .आम्ही जे बोलतो ते करून दाखवून देतो असेही त्यांनी सांगितले. ज्यांच्या हातात कला कौशल्य अनुभव आहे त्यांना मागे खेचता येणार नाही ही आजची परिस्थिती आहे. यांच्या बद्दल शालेय अभ्यासक्रमात काहीच नाही .दलित मागासवर्गाचा इतिहास शिकवला जात नाही त्यांचा इतिहास पुढे आला पाहिजे .शिक्षण क्षेत्रावर काही विशिष्ट लोकांचा पकडा आहे गरीब घरातील मुलाला डॉक्टर ,वकील ,इंजिनिअर व्हायचे आहे .पण त्यातील काही जणांचे स्वप्न पूर्ण होत आणि बाकीज्यांचे स्वप्न मोडीत निघतील अशा परिस्थितीत आहे. भारत सुपर पॉवर कसा बनेल असा प्रश्नही त्यांनी विचारला यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले की, आरक्षणा शिवाय समाजाची प्रगती होणार नाही.
१९०२ साली शाहू महाराजांनी समान हक्क मिळावा यासाठी आरक्षण लागू केले. राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घनिष्ठ संबंध होते. शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हक्क देऊन देशभर लागू केले. आज हे संविधान मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. खासदार राहुल गांधी हे संविधान रक्षक आहेत तसेच आपणही देशाची संविधान अबाधित राहावे ; यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी शाहू महाराजांच्या समाधी स्थळात भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.