छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे जल्लोषात अनावरण
ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करू दिला नाही. तीच विचारधारा आजही देशात आहे – विरोधी पक्षनेते राहुल गांधी
कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. मात्र त्यांचा राज्याभिषेक करण्यास एका विशिष्ट विचारधारेनं विरोध केला. त्याच विचारधारे विरोधात आपण आता लढत आहोत. आपली लढाई त्या विचारधारेशी असून “शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिला आहे. पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला,” असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी कोल्हापुरात केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळ्याचे अनावरण आज कसबा बावडा भगवा चौक येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. हा भव्य पुतळा शौर्य, न्याय आणि स्वाभिमान या तत्वांची आपल्या सर्वांना कायमस्वरूपी प्रेरणा देत राहणार आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज यांनी हजारो वर्षापूर्वी राज्याभिषेक केला. मात्र या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करू दिला नाही. तीच विचारधारा आजही देशात आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. मात्र तो पुतळा काही दिवसातच कोसळला. कारण यांची विचारधाराच चुकीची आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिला. पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला,” असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
यावेळी राहुल गांधीं म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजच्या काळात पुढे घेऊन जाणे म्हणजे संविधानासोबत उभे राहणे आणि सर्वसमावेशक न्यायासाठी प्रयत्न करणे” अशी भूमिका मांडली. ही भूमिका समस्त महाराष्ट्राला दिशा देणारी आहे.
याप्रसंगी शाहू छत्रपती महाराज, रमेश चेन्निथला , नाना पटोले , बाळासाहेब थोरात , विजय वडेट्टीवार , सुशीलकुमार शिंदे , पृथ्वीराज चव्हाण , डॉ. संजय डी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, रजनीताई पाटील, खा. प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, नसीम खान, विश्र्वजीत कदम, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, राहुल पाटील , बाळासाहेब सरनाईक, विलास दादा पवार , यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सभापती, उपसभापती, आदी मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते. असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा आजचा प्रेरणादायी सोहळा समस्त कोल्हापुरकरांच्या कायम स्मरणात राहील असे शिवमय वातावरणात होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुतळा समितीचे सदस्य, कसबा बावडा, लाइन बाजार वासीय, सर्व तरुण मंडळे यांनी मनापासून सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन व आभार आमदार सतेज पाटील यांनी मानले.