लोहपुरुष केएससी ट्रायथलॉन, डूएथलॉन पावर्ड बाय रगेडियन स्पर्धा येत्या २२ सप्टेंबरला आयोजित, देश विदेशातील ५०० हून अधिक स्पर्धकांचा असणार सहभाग
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर ही क्रिडानगरी जगभर प्रसिद्ध आहे.या नगरीत अनेक खेळाडू घडलेले आहेत.शिवाय अनेक खेळाडू कोल्हापूरचे नाव उंचावत आहेत.या क्रीडानगरीत विविध कलेला राजाश्रय दिला गेलेला आहे.स्पर्धकांमध्ये खेळाची उत्तेजना निर्माण व्हावी स्पर्धकांना व्यासपीठ मिळावे यासाठी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने येत्या २२ सप्टेंबर रोजी लोहपुरुष या नावाची ट्रायथलॉन आणि डूएथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे चेतन चव्हाण आणि रगेडियनचे आयर्नमॅन आकाश कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब ही चॅरीटेबल ट्रस्ट असून यांच्यातर्फे विविष स्पर्धा घेतल्या जातात. रगेडीयन आणि केएससीच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते यातीलच सलग सहाव्या वर्षी २२सप्टेंबर रोजी ट्रायथलॉन आणि डूएथलॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेला लोह पुरुष हे नाव देण्यात आले असून राजाराम तलाव येथे सकाळी सहा वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.२ किलोमीटर पोहणे,९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग अशा तीन प्रकारात या स्पर्धा होणार आहेत.ट्रायथलॉनमध्ये स्विमिंग,सायकलिंग आणि रनिंग या स्पर्धांचा समावेश आहे तर डूएथलॉन मध्ये केवळ रनिंग आणि सायकलिंग स्पर्धा होणार आहेत. या क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने या स्पर्धा होत असून देश विदेशातील ५०० हून अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होत आहेत.स्पर्धेत नाव नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना, टी-शर्ट, मेडल, टाईम चिप, सर्टिफिकेट, बॅग आणि अल्पोपहार आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.शिवाय स्पर्धेदिवशी स्पर्धकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. धमाल मस्ती या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्पर्धकांना करावयास मिळणार आहे.यावेळी पत्रकार परिषदेला डॉ.विजय कुलकर्णी, डॉ.प्रदीप पाटील, आशिष तंबाके, एस.आर.पाटील,गोरख माळी,आदित्य शिंदे,महेश शेळके आदी उपस्थित होते.