Wednesday, November 19, 2025
spot_img
Homeताज्यालाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! - कोल्हापूर येथील...

लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! – कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या !

‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! – कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

कोल्हापूर /प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे, मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या सुरूच आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या!’ बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 31 जुलै या दिवशी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली. उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. कु. यशश्रीची हत्या करणार्‍या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही या वेळी करण्यात आली. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या.या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे म्हणाल्या, ‘‘ महाराष्ट्रातून वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत, यामागे काही षड्यंत्र तर नाही ना !, ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे. उरण-पनवेल मार्गावरील एन्.आय. हायस्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे ‘श्रद्धा वालकर प्रकरणा’ची आठवण संपूर्ण देशाला झाली आहे. नवी मुंबईतील विवाहितेच्या शीळ डायघर परिसरातील खून प्रकरणाची घटना ताजी असतांनाच आता उरणमधील ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि हिंदू युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. ही केवळ पहिली घटना नसून ‘श्रद्धा वालकर, रुपाली चंदनशिवे, सोनम शुक्ला’ या अनेक हिंदू मुलींना लक्ष करण्यात आलेले आहे.’’
राज्यात दिवसेंदिवस महिला-मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर ‘अँटी रोमिया स्कॉड’सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांच्या प्रेमप्रकरणांच्या तक्रारी ‘लव्ह जिहाद’ म्हणून नोंदवल्या जाव्यात, तसेच या प्रकरणांत काही धर्मांध आणि कट्टरतावादी जिहादी संघटना, जिहादी नेते, परकीय शक्ती आढळून आल्यास त्यांची पाळेमुळे खणून काढावीत. त्यांच्यावरही तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्याही या आंदोलनात करण्यात आल्या.या प्रसंगी भारतीय मजदूर संघाच्या अधिवक्ता अनुजा धरणगावकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे समन्वयक श्री. आनंदराव पवळ, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, मातृशक्ती संघटनेच्या सौ. अश्‍विनी ढेरे, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, श्री. विकास जाधव, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र बुरुड, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या रेखा दुधाणे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिजित पाटील, रामभाऊ मेथे, आदित्य कराडे उपस्थित होते.यावेळी धारावी (मुंबई) येथे हिंदु तरुणाची हत्या करणार्‍या धर्मांधांना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली.या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘धारावी (मुंबई ) येथे निशार शेख आणि आरिफ यांच्यासह काही धर्मांध मुसलमानांनी अरविंद वैश्‍व या २७ वर्षीय हिंदु तरुणाची हत्या केली. अरविंदला ७ जणांनी मिळून मारलेले असतांना पोलिसांनी ७ जणांपैकी दोघांनाच आरोपी दाखवल्याने विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. तरी या प्रकरणी दोषी असणार्‍या सर्व धर्मांधांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी.’’अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments