Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याजिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. २ (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात २.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील- यवलूज, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव असे ९ बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी २.६५ टीएमसी, तुळशी १.३५ टीएमसी, वारणा १२.१९ टीएमसी, दूधगंगा ४.७३टीएमसी, कासारी ९५.० टीएमसी, कडवी १.२९ टीएमसी, कुंभी ०.९२ टीएमसी, पाटगाव १.६७ टीएमसी, चिकोत्रा ०.५१ टीएमसी, चित्री ०.५९ टीएमसी, जंगमहट्टी ०.५१ टीएमसी, घटप्रभा १.५५ टीएमसी, जांबरे ०.५९ टीएमसी, आंबेआहोळ ०.८९ टीएमसी, सर्फनाला ०.०६ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.१० टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १९.३ फूट, सुर्वे २०.४ फूट, रुई ४६.३ फूट, इचलकरंजी ४४.९ फूट, तेरवाड ४१.६ फूट, शिरोळ ३१.६ फूट, नृसिंहवाडी २५ फूट, राजापूर १४.९ फूट तर नजीकच्या सांगली ८.३ फूट व अंकली ८.१० फूट अशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments