Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यारंकाळा परिसरात अंतर्गत वादातुन तरुणाचा भीषण खून

रंकाळा परिसरात अंतर्गत वादातुन तरुणाचा भीषण खून

रंकाळा परिसरात अंतर्गत वादातुन तरुणाचा भीषण खून

कोल्हापुर/प्रतिनिधी : रंकाळा परिसरात अंतर्गत वादातुन अजय दगडू शिंदे (वय २५ रा.यादवनगर ,डवरी वसाहत) याचा चौघां जणानी एडका ,तलवार आणि कोयत्याने हल्ला करून हत्यारे तेथेच टाकून मारेकरी पळून गेले.या हल्ल्यात अजय शिंदे याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह सीपीआर रुग्णालयात हलवून पोलिसांनी हत्यारे जप्त केली.ही घटना साडे पाच ते सहा या दरम्यान घडली असून या घटनेची फिर्याद सौरभ गणेश चांदणे (वय २६.रा.यादवनगर) याने सीपीआर पोलिस चौकित दिली आहे.या खूनाची माहिती समजताच त्यांच्या नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात गर्दी करून तेथेच ठिय्या मारला .या वेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.अधिक माहिती अशी की,अजय शिंदे आणि त्याच्याच समाजातील काहीबरोबर गेल्या काही दिवसांपासून वाद धुमसत होता.परत आज वाद झाल्याने काहीनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.परत सायंकाळी बैठक घेऊन वाद मिटविणार होते.पण रोहित शिंदे,सचिन माळी,अक्षय माळी आणि अन्य एकाचे नाव समजू शकले नाही.या चौघांनी अजय शिंदेला रंकाळा परिसरात बोलावून घेऊन त्याच्यावर हल्ला करून खून केला.हे चौघेही जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे समजते.अजय शिंदे विवाहित असून त्याला ६ महिन्याचा मुलगा आहे.सीपीआर परिसरात शहर उपअधीक्षक अजित टिके ,जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे ,पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments