Wednesday, November 19, 2025
spot_img
Homeताज्याव्यापक संशोधनातूनच बदलत्या जगाच्या अपेक्षांचे आव्हान यशस्वीपणे पेलले जाणार : सायबर मध्ये...

व्यापक संशोधनातूनच बदलत्या जगाच्या अपेक्षांचे आव्हान यशस्वीपणे पेलले जाणार : सायबर मध्ये ‘ बदलते जग ‘ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ

व्यापक संशोधनातूनच बदलत्या जगाच्या अपेक्षांचे आव्हान यशस्वीपणे पेलले जाणार : सायबर मध्ये ‘ बदलते जग ‘ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहू इन्स्टीटयूट ‘ सायबर तर्फे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय ‘ बदलते जग ‘ या परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .प्रमुख पाहुणे किलोस्कर ऑइल इंजिन उद्योग समुहाचे विवेक देशपांडे म्हणाले शाश्वततेकडे जाताना स्पष्ट धोरण व शास्त्रीय पद्धतीने अंमलबजावणी आवश्यक आहे कंपनीचा प्रत्यक्ष केस स्टडी त्यांनी उपस्थितांसमोर पॉवर पॉईट ने सादर केला.याप्रसंगी तीन मान्यवरांना आंतरराष्ट्रीय सहबंधित्व पारितोषिक सायबर तर्फे जाहीर करण्यात आले. यामध्ये वावुनिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ती मंगलेश्वर न, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख संचालक डॉक्टर दिनेश हरिराम, कुमारी निषमा अरोस आंतरराष्ट्रीय संबंध विभाग प्रमुख अंतोन बीकॉम विद्यापीठ सूरिनाम
पामोरिबो यांचा समावेश आहे .
यावेळी डॉ दिनेश हरिराम यांनी उद्योग ५.० या कल्पने वरती विस्तृतपणे आपले विचार ऑनलाईन पद्धतीने मांडले.सायबर प्रेस तर्फे निर्मित साऊथ एशियन जर्नल ऑफ मॅनेजमेंट साजमार या आंतरराष्ट्रीय जर्नलचे दोन व्हॉल्यूम प्रकाशित करण्यात आले. याशिवाय सी आय जे इ सायबर आंतरराष्ट्रीय पर्यावरण जर्नल संशोधन पत्रिकेच्या पहिल्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रशिक्षण संशोधनाचा समाज उपयोगी वापर होण्याच्या दृष्टीने आयआयएम इंदोर येथील प्रशिक्षणानंतर केस स्टडीज वर आधारित सायबरच्या प्राध्यापकांनी लिहिलेल्या इनसाइट्स या पुस्तकाचे आणि श्रीलंका येथील भेटीदरम्यान आलेल्या पर्यटन अनुभवांचे ट्रॅव्हलॉग या पुस्तकाचे प्रकाशन समारंभाचे औचित्य साधून करण्यात आले.
यावेळी सहयोगी देश मॉरिशस व श्रीलंका येथून प्रत्यक्ष हजर असलेल्या डॉ के अर्जुनन डॉ निलेश रामफल डॉ युवराज सुनेचर यांची विविध विषयांवर भाषणे झाली.
दुपारच्या सत्रात चार वेगळ्या कक्षात उपस्थित सहभागी संशोधकांचे शोधनिबंध सादर करण्यात आले. यावेळी सायबर ट्रस्टचे सचिव ऋषिकेश शिंदे व विश्वस्त डॉ हिलगे उपस्थित होते.
शैक्षणिक सहबंधुत्वाच्या पायवाटेवर सी सायबर ने तिसरे भक्कम पाऊल टाकले असून शैक्षणिक क्षेत्रातील वेगळेपण सिद्ध करण्यासाठी सर्व सायबर परिवार कटिबद्ध आहे असे डॉ रथ यांनी स्पष्ट केले बदलत्या जगाच्या अपेक्षांचे आव्हान गांभीर्याने आणि शास्त्रीय पद्धतीने स्वीकारण्याची गरज परिषदेच्या निमित्ताने स्पष्ट झाली आहे.परिषदेस ८० च्या वर शोधनिबंध आले आहेत .देशातील विविध विद्यापीठांसह श्रीलंका आणि मॉरेशिस चे संशोधक प्रतिनिधी प्राध्यापक यामध्ये सहभागी असून इतर पाच देशातील संशोधक ऑनलाईन पद्धतीने आपले शोधनिबंध यामध्ये सादर करत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments