Wednesday, November 19, 2025
spot_img
Homeताज्यासंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास” कार्यक्रम उत्साहात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास” कार्यक्रम उत्साहात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास” कार्यक्रम उत्साहात संपन्न

नवीन संकल्प आधारित उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर मागणी डॉ. नवीन खंदारे

जयसिंगपूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या उद्योजकता विकास आणि तंत्रज्ञान व्यवसाय इनक्यूबेटर सेल अंतर्गत ‘तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ ते १३ मार्च २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ, लोणेरे, इनोव्हेशन अँड इंक्युबॅशन मुख्य अधिकारी डॉ. नवीन खंदारे, सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार सी. बी. कोरा खादी ग्रामोद्योग आयोग प्राचार्य, डॉ. सी. बी. सिंथॉल कुमार, उमाकांत डोईफोडे, भारतीय युवाशक्ती ट्रस्टचे कोल्हापूर क्लस्टर हेड विश्वनाथ पवार, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागप्रमुख प्रा.अजय कोंगे, ईडीपी आणि टीबीआय सेल सर्व सदस्य, शॉर्ट टर्म कोर्स, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री, शिक्षण घेत असलेल्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी उपस्तीत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. डॉ. नवीन खंदारे म्हणाले नवीन आयडिया आधारित उद्योगाची निर्मिती करून देशाला आत्मनिर्भर बनविण्याची संधी तंत्र शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्तम असून नाविन्यपूर्ण आयडिया आणि त्या आयडिया आधारित उद्योजकांना जागतिक स्तरावर मागणी आहे. डॉ सी. बी. सेथिल कुमार यांनी उद्योग आणि खादीग्राम आयोगाच्या विविध योजनांची माहिती सांगून विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या योजनासाठी आवश्यक पोर्टल वरील माहिती भरून सुरू करणाऱ्या नवीन उद्योगाला शासन वेगवेगळ्या स्तरावरून अनुदान आणि कर्ज प्राप्त करत आहे. त्या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी नवीन संकल्पना धारित उद्योग सुरू करावेत. भारतीय युवाशक्ती ट्रस्टचे विश्वनाथ पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवीन उद्योजकांना केलेले साह्य उद्योजक निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक त्या कागदपत्राची माहिती प्रस्ताव दाखल करण्याची माहिती आणि वेगवेगळ्या बँकेचे सहकार्य याविषयी मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि नवीन उद्योग कसा निर्माण होतो याविषयी मार्गदर्शन प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणित भोसले, कु. सानिका गुरव या विद्यार्थ्यांनी केले आभार प्रदर्शन कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागप्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी मानले.संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले यांनी तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास” कार्यक्रममास शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments