Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार मुंबई/प्रतिनिधी :…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रासंगिक लेख मातीत जन्मलो…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन कोल्हापूर, दि. ९: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संगीतसूर्य…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई…

My Marathi

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित…

माय मराठी

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा पुढाकार आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण  …

माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र…

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र…

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला! कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड…

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा कोल्हापूर/प्रमोद पाटील  : “चांगभलं” च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून…

माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार कोल्हापूर/प्रतिनिधी :…

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार   कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या इतिहास…

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक टीझर’ अखेर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नुकताच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये विशेषरीत्या प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरला थिएटरमध्ये टाळ्या आणि जल्लोषाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही प्रेक्षकांनी टीझर बद्दल प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता हाच टीझर डिजिटल माध्यमातून प्रदर्शित होतो आहे, भारताच्या सर्वश्रेष्ठ महान अश्या राजाची भव्य झलक अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचे भव्य चित्रण यात करण्यात आले आहे. अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून ऐतिहासिक विषयाला आधुनिक सिनेमॅटिक भव्यतेची जोड देण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
या चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन ईरानी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद जोशी,अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख , आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटात एकत्र आली आहे.
यात थरारक ॲक्शन दृश्ये, वेधक आणि भावनिक नाट्य, दमदार संवाद आणि अंगावर रोमांच उभे करणारे संगीत यामुळे हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा न राहता एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलेले दर्जेदार संगीत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी असल्यामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट तर आहेच याशिवाय भारताच्या ऐतिहासिक वारस्याला जागतिक स्तरावर सादर करण्याची क्षमता ठेवतो.
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या टीझरला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा या चित्रपटाबद्दलच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा ठोस पुरावा आहे. खचाखच भरलेल्या थिएटर्समध्ये उमटलेल्या टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष यावरून ‘राजा शिवाजी’च्या ऐतिहासिक विश्वात रममाण होण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, हे स्पष्ट होते. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर हा टीझर आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचत असून, या भव्य चित्रपटाच्या यशस्वी प्रवासाची दमदार सुरुवात ठरत आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट एका प्रेरणादायी कथा असून हा चित्रपट भाषेच्या सीमा ओलांडत जागतिक स्तरावर सादर करण्याचे निर्मात्यांचे उद्दिष्ट आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख यांनी निर्मिती केली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या उदयाला समर्पित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’ चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार असून, हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा फर्स्ट लूक टीझर ‘धुरंधर-द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सशुल्क प्रिव्ह्यूद्वारेही प्रेक्षकांना या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची सिनेमॅटिक झलक मोठ्या पडद्यावर नक्की बघा. रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात भारतातील एका महान योद्धाची गाथा , त्याचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आता संपूर्ण जग या फर्स्ट लूक टीझर मधून बघेल.या भव्य ऐतिहासिक कलाकृतीत संगीताची जादू अजय-अतुल यांनी दिली असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी आपल्या अप्रतिम छायाचित्रणातून या गाथेला भव्य दृश्यरूप दिले आहे. भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडत भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा उद्देश आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या जन्मास भव्य आदरांजली अर्पण करणारी ही ऐतिहासिक गाथा प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. भव्यतेचा नवा अध्याय, इतिहासाची थरारक गर्जना भारतासह जगभरात गाजण्यासाठी भव्य पडद्यावर सज्ज झाली आहे.

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा पुढाकार

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

कोल्हापूर/प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून फेडरेशनच्यावतीने येत्या ३ एप्रिल रोजी महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि चर्चासत्र आयोजित केले आहे. यावेळी सहकारी पतसंस्था क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना, सहकार सम्राज्ञी पुरस्काराने गौरवले जाणार आहे अशी माहिती राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा आणि भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी  दिली.
कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयाच्या आनंद भवन सभागृहात महिला मेळावा आयोजित केला आहे. यापूर्वी शिर्डी येथील पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण केंद्रात तीन वेळा मेळावे झाले आहेत. त्यानंतर नाशिक तसेच जुन्नर तालुक्यातील आळे फाटा आणि छत्रपती संभाजीनगर येथे अशा प्रकारचे मेळावे झाले आहेत. यंदाचा मेळावा भागीरथी महिला पतसंस्थेच्या सहकार्यातून कोल्हापुरात होत आहे. सहकार चळवळीत महिलांचा सहभाग वाढावा, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
सहकार क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या यशस्वी महिलांचा यावेळी सन्मान होणार आहे. त्यामध्ये बेस्ट चेअरमन, बेस्ट सीईओ आणि बेस्ट विक्री प्रतिनिधीसाठी पुरस्कार दिले जाणार आहेत. सहकार सम्राज्ञी किताबा अंतर्गत पहिल्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि प्रमाणपत्र,दुसर्‍या क्रमांकासाठी १५ आणि तिसर्‍या क्रमांकासाठी ११ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे अशी माहिती भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी दिली.
खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, महापौर रुपाराणी निकम आणि गोदावरी अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून महिला सबलीकरणासाठी कायद्यातील अपेक्षित बदलांवर चर्चासत्र होईल. तर व्यवसायासाठी निधी कसा उभा करावा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, गुणवत्तापूर्ण पॅकेजिंग आणि मार्केटिंग कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांनी दिली.
महाराष्ट्रात अगदी तळागाळापर्यंत पतसंस्थांचे जाळे विस्तारले आहे. आर्थिक दृष्टया कमकुवत आणि गरजू घटकांना पतपुरवठा करण्यात पतसंस्था आघाडीवर असतात. कमकुवत घटकांचा पाया मजबुत करण्याचे काम या माध्यमातून होत आहे. राज्यात १४ हजार ५०० पतसंस्था आहेत. तर कोल्हापूर जिल्हयातील पतसंस्थांची संख्या १ हजार ३०० आहे. पतसंस्थांचे कामकाज कसे करावे, चेअरमन- व्हाईस चेअरमन आणि संचालकांची जबाबदारी, महिला संचालकांचा पतसंस्थांच्या कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढवणे, महिला पतसंस्थांनी कोणत्या प्रकारच्या कर्ज वितरणावर भर द्यावा, ठेवी वाढवण्यासंबंधीचे उपाय, कर्ज वसुली यंत्रणा सक्षम कशी बनवावी, या संदर्भात मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील पतसंस्थांचे चेअरमन, उपाध्यक्ष, संचालक या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक सागर चौगुले, जवाहर छाबडा, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, चार्टर्ड अकौंटंट शिवराज मगर आदी उपस्थित होते.

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त भुये (ता. करवीर) येथील मानाची सासनकाठी क्रमांक ४० यंदा पर्यावरणपूरक उपक्रमामुळे विशेष चर्चेत आली. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले.सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र वाडी-रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे चैत्र यात्रा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सर्व मानाच्या सासनकाठ्यांनी यात्रेत सहभाग घेतला; मात्र सासनकाठी क्रमांक ४० ने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वेगळी ओळख निर्माण केली.
प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, सासनकाठीच्या मानकऱ्यांनी “पर्यावरण वाचवा” हा संदेश देण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार दुपारी सुमारे ३ वाजता सासनकाठीची बारी सुरू होताच, काठी क्रमांक ४० सोबत भुये गावच्या भाविकांनी पर्यावरण जनजागृतीचे फलक हातात घेत यात्रेत सहभाग घेतला.फलकांवर “जंगलतोड रोखू, पर्यावरण वाचवू”, “प्लास्टिकमुक्त व केमिकलमुक्त चैत्र यात्रा साजरी करू”, “कापडी पिशवीचा वापर करा”, “लावा झाडे, वाचवा पुढची पिढी”, “वनवा पेटवू नका” अशा संदेशांद्वारे भाविकांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी सासनकाठी परिसरात कापडी पिशव्यांचे वाटप करून परिसर प्लास्टिकमुक्त करण्यात आला. तसेच भाविकांनी “चांगभलं – मानाची सासनकाठी नंबर ४०” असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या परिधान करून उपक्रमात सहभाग घेतला.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सासनकाठी क्रमांक ४० जवळ भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सासनकाठी नाचवून या उपक्रमास प्रोत्साहन दिले. तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागातील प्रतिनिधींनीही या उपक्रमाचे कौतुक करत छायाचित्रे घेतली.हा उपक्रम सासनकाठीचे मानकरी अमर पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी भुये, भुयेवाडी, निगवे, शिये, जठारवाडी या पंचक्रोशीतील जोतिबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, सासनकाठी क्रमांक ४० ने यंदाची चैत्र यात्रा केवळ भक्तिभावानेच नव्हे, तर सामाजिक जाणीव आणि पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवत गाजवली.याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषद चे सीईओ एस कार्तिकेएन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नायकवडी भुये चे बाजीराव पाटील रामचंद्र पाटील रमेश पाटील शिवाजी पाटील तानाजी पाटील सर्जेराव पाटील विश्वास पाटील धनाजी पाटील प्रणव पाटील निलेश पाटील आदी मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा जोतिबा डोंगर ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने न्हाऊन निघाला. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे आज चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा जवळजवळ आठ लाख भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगलप्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी जोतिबा देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे पाच वाजता श्रींचा शासकीय अभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. दुपारी बाराच्या सुमारास मंत्री शंभूराज देसाई यांनी सासनकाठ्यांचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली. या वैभवशाली मिरवणुकीमध्ये परंपरेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या सासनकाठीला पहिला मान देण्यात आला. त्यापाठोपाठ मौजे विहे (ता. पाटण), कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा) आणि कवठेएकंद (जि. सांगली) यांसह एकूण १०८ मानाच्या सासनकाठ्या ढोल-ताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात सहभागी झाल्या होत्या. डौलाने नाचवल्या जाणाऱ्या या सासनकाठ्या आणि त्यावर होणारी गुलाल-खोबऱ्याची उधळण भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती.
प्रशासनाच्या वतीने यंदाची यात्रा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, अन्नछत्र, सुसज्ज दर्शन रांग, पार्किंग व्यवस्था आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संपूर्ण यात्रा परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली, तर जे भाविक उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी लाईव्ह दर्शनाची सोयही करण्यात आली होती. बैलगाड्या, खासगी वाहने आणि पायी चालत आलेल्या लाखो भाविकांनी डोंगरवाटा ओसंडून वाहत होत्या, ज्यामुळे अवघा जोतिबा डोंगर गुलाबी रंगाच्या छटेत आणि भक्तीच्या रसात न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला.
ज्योतिबा डोंगरावर आरोग्य व्यवस्था करण्यात आली होती टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनच्या वतीने गाड्यांच्या दुरुस्तीसाठी मोहीम राबवली होती याचबरोबर ज्योतिबा डोंगरावर प्रसादाचे दुकानेही थाटण्यात आली होती. पार्किंग व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आल्या होत्या ज्योतिबा डोंगरावर गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात झाली.जोतिबा डोंगरावर आमदार विनय गोरे आणि गायमुखाच्या इथे सहज सेवा ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्योतिबा डोंगर भाविकांच्या उपस्थितीत नाऊन निघाला होता. केरली पासून मंदिरापर्यंत सर्वत्र पाणी वाटप, प्रसादाचे वाटप,कोकम सरबत वाटप करण्यात आले.

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड यज्ञ कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीवर, म्हणजेच दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी सुरू आहे. तो यज्ञ म्हणजे ‘सहजसेवा ट्रस्ट’चे अन्नदान! लाखो भक्तांची भूक भागवणारे हे अन्नछत्र केवळ उपक्रम नसून तो लाखो भाविकांच्या विश्वासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.यावर्षीच्या अन्नछत्राची सुरुवात एका अत्यंत भावूक आणि मांगल्याने न्हाऊन निघालेल्या प्रसंगाने झाली.

भक्तांची ओढ आणि भावना

अन्नछत्र सुरू होण्यापूर्वीच, बेळगावच्या जोतिबा भक्तांच्या भक्तीचा सुगंध डोंगरावर दरवळला. कोडसकोप (बेळगाव) आणि चव्हाटा गल्ली (बेळगाव) येथील मानाच्या सासनकाट्या जोतिबाच्या डोंगरावर विसावल्या. या भक्तांच्या मनात एकच आर्त इच्छा होती—ज्या ठिकाणी लाखो भाविक प्रसादाचा लाभ घेतात, त्या पवित्र ठिकाणी (गायमुख) पूजा करण्याची.

भक्तांची ओढ इतकी पराकोटीची होती की, त्यांच्या भावनांचा आदर करत सहजसेवा ट्रस्टने या पूजेला आनंदाने संमती दिली. मग काय… वातावरणच बदलून गेले!
स्वयंपाकाची जागा आणि मुख्य मंडप अशा दोन्ही ठिकाणी भक्तांनी मनोभावे पूजेची मांडणी केली.
‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गुलालाची उधळण आणि टाळ-मृदंगाचा गजर यामुळे प्रत्यक्ष देवच तिथे अवतरल्याचा भास होत होता.जेव्हा दोन्ही गावच्या भक्तांनी मनोभावे पूजा अर्चा आटोपली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे कोणत्याही शब्दांत न मावणारे होते.
“भक्ती जिथे असते, तिथे देव स्वतःहून धावून येतो. या भक्तांची श्रद्धा आणि निष्ठा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या पूजनाने अन्नछत्राच्या जागेचे पावित्र्य अधिकच वृद्धिंगत झाले आहे.”या मांगल्याच्या वातावरणात, भक्तांच्या आशीर्वादाने आज रात्रीपासून सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र विधिवत सुरू होत आहे. जेवण बनवणाऱ्यांच्या हातांत सेवाभाव आहे आणि वाढणाऱ्यांच्या मनात आपुलकी. अशा या पवित्र कार्यात सहभागी होणे, हे कोणत्याही भक्तासाठी भाग्याचेच आहे.धन्य तो जोतिबा देव आणि धन्य ते त्याचे भक्त! हा भक्तीचा सोहळा असाच अविरत चालू राहो, हीच चरणी प्रार्थना.

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

कोल्हापूर/प्रमोद पाटील  : “चांगभलं” च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून गेला आहे. आधुनिकतेच्या युगात जिथे वाहनांचा वेग वाढला आहे, तिथे आजही चैत्र यात्रेच्या निमित्ताने एक जुनी, निखळ आणि तितकीच जिव्हाळ्याची परंपरा कायम आहे. ही परंपरा आहे—आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सोबत घेऊन, बैलगाडीतून जोतिबाच्या दर्शनाला येण्याची.
बैलगाड्यांचा थाट आणि भक्तीचा प्रवास शेतकरी, कष्टकरी आणि गोर-गरीब जनतेचे कुलदैवत असलेल्या जोतिबाच्या दर्शनासाठी आजही अनेक कुटुंबं शेकडो मैलांचा प्रवास बैलगाडीतून पूर्ण करतात. या प्रवासात थकवा नसतो, असतो तो केवळ देवाच्या दर्शनाचा ओढ. या यात्रेसाठी बैलांना खास नटवण्यात येते; शिंगे रंगवलेली, गळ्यात घुंगरांच्या माळा आणि कपाळावर रेशमी गोंडे अशा थाटात हे ‘लवाजमे’ जोतिबा डोंगराच्या दिशेने कूच करतात. गाड्यांनाही आकर्षक रंगरंगोटी करून सजवले जाते. दोन-तीन दिवसांचा खडतर प्रवास करून आज दुपारपासून या बैलगाड्या डोंगरावर दाखल होऊ लागल्या आहेत.

सहज सेवा ट्रस्ट: मुक्या प्राण्यांची मायेने सेवा

जोतिबा डोंगरावर कडक उन्हाचा तडाखा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. अशा परिस्थितीत शेकडो मैल चालून आलेल्या या बैलांच्या चाऱ्याची आणि पाण्याची सोय होणे अत्यंत कठीण असते. हीच गरज ओळखून ‘सहज सेवा ट्रस्ट’ गेल्या २५ वर्षांपासून एक स्तुत्य उपक्रम राबवत आहे.केवळ भक्तांसाठी ‘अन्नछत्र’ न चालवता, ‘भूतदया’ हाच खरा धर्म मानून ट्रस्टतर्फे येणाऱ्या बैलांचीही विशेष काळजी घेतली जाते. यामध्ये: कपरी पेंड आणि भुस्सा: बैलांच्या शक्तीसाठी पौष्टिक आहार,चाऱ्याची सोय: हिरवा चारा आणि कोरडे गवत.

२५ वर्षांचे अखंड व्रत

सहज सेवा ट्रस्टने ही सेवा केवळ एक उपक्रम म्हणून नव्हे, तर कर्तव्य म्हणून स्वीकारली आहे. डोंगरावर भर उन्हात बैलांना चारा मिळणे कठीण असते, हा संवेदनशील विचार करून ही ‘भूतदया सेवा’ मनोभावे राबवली जाते. यामुळेच ही प्राचीन परंपरा आजही टिकून आहे.परंपरा आणि सेवा यांचा हा संगम जोतिबाच्या चैत्र यात्रेचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करतो. भक्तांचा उत्साह आणि मुक्या प्राण्यांप्रती असलेली ही कृतज्ञता खरोखरच कौतुकास्पद आहे.ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दि. ३१-३-२०२६ ते ०४-०४-२०२६ या कालावधीत ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ संपन्न होत आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी बोलताना स्वामीजी म्हणाले, “ या कारागीर महाकुंभात पारंपारिक, हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करतील पण अलीकडच्या काळात लोकांच्या आवडीनुसार व मागणीनुसार कला आणि हस्तकलामधील विविध प्रकार बघायला मिळतात. अश्या कला आणि हस्तकला राज्या-राज्यातून पाहायला मिळतात, कलाकारांचे कसब आणि कौशल्य यातून कलात्मक व आकर्षक अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होते व त्या वस्तूला चांगली मागणी व बाजारपेठ मिळते. इतकेच नाही तर अश्या वैशिष्ट्यपूर्ण कलानिर्मितीला आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील बाजारपेठ मिळते. कारागीर कुंभोत्सवामध्ये अश्या विविध राज्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. आणि एकूण १७ राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० हून कलाकार ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभा’मध्ये सामील होत आहेत.
कारागीर कुंभामध्ये असे कलाकार आपल्या कलेचे प्रत्यक्षरित्या प्रदर्शन करतील. परंतु त्यासोबत अशा कलेतून तयार केलेले वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध करतील. आणि म्हणून या कारागीर महाकुंभाला प्रत्येकाने भेट देणे आवश्यक आहे.”टेराकोटा, मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वुड कला, बांबू काम, लेदर वर्क विविध राज्यातील एंब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला बाहुलींच्या प्रतीकात्मक ऐतिहासिक मुर्ती, स्टोन वर्क, कच्छ मधील राबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्न पासून वस्तू. मधुवेनी पेंटिंग, लाकेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या इ. हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये बघायला मिळणार आहेत.
यावेळी प्रस्तावना करताना विवेक सिद्ध म्हणाले, “ तंत्र महाविद्यालय, महाविद्यालय, पॉलीटेक्नीक, अभियांत्रिकी महाविद्यालय, आय.टी.आय. यात शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना या कारागीर महाकुंभासाठी पाचारण केले आहे. जेणेकरून हे युवक-युवती या कालेंचा अध्ययन करतील व या कलांच्यामध्ये आधुनिकतेची जोड कशी देता येईल याचा विचार करतील की जेणेकरून या सर्व कला अविष्कारांना छोटे-छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि म्हणून हा ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ एक आगळा वेगळा सोहळा आहे. कोल्हापूर शहरातील स्वतः भेट द्यावी, मित्र, आप्टेष्ट, मित्र नातेवाईक यांना देखील प्रोत्साहित करावे त्यामुळे देशभरातील कारागीरांचा सन्मान होईल व त्यांच्या कलेला गौरव होईल. यासाठी एकत्वं इन्फ्रा कंपनीचा सहभाग आहे.
या पत्रकार परिषदेसाठी सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्यकार्यकारी अधिकारी जी.पी.वढड, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव, विवेक सिद्ध, दयानंद डोंगरे, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, दिवाकर पाटील, पुनीत मुचंडी उपस्थित होते.

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आणि मराठेशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात पंचगंगा घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या महिन्यापासून ते फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या जाण्याने इतिहासकार, साहित्यिक, राजकारणी आणि सामान्य वाचकांमध्ये शोककळा पसरली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह राज्यभरातील नेते व लेखकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर गावी एका सामान्य कुटुंबात झाला. गरिबी व संघर्ष असूनही त्यांनी जिद्दीने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून एम.ए. (सर्वोत्कृष्ट) आणि शिवाजी विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी संपादन केली. १९६४ पासून डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करून त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून सेवा दिली.

मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकणारे डॉ. पवार यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे ‘महाराणी ताराबाई’ व ‘राजर्षी शाहू छत्रपती’ ही चरित्रे होत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाविरुद्ध स्वराज्य टिकवण्यात ताराबाईंचा मोलाचा वाटा होता, हे पुरेशा पुराव्यानिशी सिद्ध करून त्यांनी इतिहासाच्या मांडणीला नवे वळण दिले. त्यांनी एकूण ५० हून अधिक ग्रंथ आणि ४५ शोधनिबंध लिहिले असून ‘सेनापती संताजी घोरपडे’, ‘मराठेशाहीचा मागोवा’ यांसारखे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. १२०० पानांचा, तीन खंडांचा ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ संपादित करून त्यांनी तो भारताच्या १६ भाषांसह रशियन, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषांमध्ये अनुवादित केला. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच १९९२ मध्ये स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’चे ते संस्थापक-संचालक व शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत राहिले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून तीन वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवले.

राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाला ऐतिहासिक सल्ले देऊन त्यांनी शाहू मिल आणि खासबाग मैदान यांचे जतन केले. महात्मा फुले व शाहू महाराजांच्या सत्यशोधकी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेले डॉ. पवार हे इतिहासाची तटस्थ आणि मानवी मूल्यांवर आधारित मांडणी करत असत.

गुरुवारी सकाळी १०.०० वाजता ‘शिवतेज’ बंगला, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. साने गुरुजी वसाहत, जुना वाशी नाका, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, खासबाग मैदान, बिंदू चौक, पद्मा टॉकीज, दसरा चौक (राजर्षी शाहू पुतळा), शाहू स्मृतीस्थळ, जुना बुधवार पेठ मार्गे ही यात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली. यावेळी शासन-प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे, तर कोल्हापूरवासीयांच्या वतीने खासदार शाहू छत्रपती यांनी डॉ. पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

याप्रसंगी पोलिसांनी बंदुकीच्या ३ फैरी झाडून त्यांना मानवंदना (सलामी) दिली, तसेच पोलीस धूनही सादर करण्यात आली. यावेळी डॉ. पवार यांच्या कुटुंबातील सदस्य प्रा. डॉ. अरुंधती पवार, डॉ. प्रा. मंजुश्री पवार, पृथ्वीराज पवार आणि रिया पवार तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, पोलीस उपाधिक्षक श्रीमती प्रिया पाटील, होम डीवायएसपी तानाजी सावंत, इतिहास अभ्यासक-संशोधक डॉ.इंद्रजीत सावंत, प्रा. रमेश जाधव, राजेश लाटकर, आझाद नाईकवाडी, माजी महापौर आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाळ पाटणकर, हर्षल सुर्वे, सुरेंद्र जैन, मेधा पानसरे, आदिल फरास, श्रीराम पवार, विजय देवणे, अजेय दळवीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘डॉ. जयसिंगराव पवार अमर रहे’ अशा घोषणा देत हजारो कोल्हापूरवासीयांनी इतिहासाच्या या साक्षेपी अभ्यासकाला श्रद्धांजली अर्पण करून साश्रू नयनांनी अंतिम दर्शन घेतले.

त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके

महाराणी ताराबाई
क्रांतिसिंह नाना पाटील
सेनापती संताजी घोरपडे
संभाजी स्मारक ग्रंथ
मराठेशाहीचा मागोवा
मराठी साम्राज्याचा उदयास्त
शिवचरित्र- एक मागोवा
शिवचरित्रापासून काय शिकावे?
आमच्या इतिहासाचा शोध व बोध
राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ (३ खंड)
मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध
मराठेशाहीचे अंतरंग
शिवपुत्र छत्रपती राजाराम
छत्रपती संभाजी- एक चिकित्सा
राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य
राजर्षी शाहू छत्रपती: एक मागोवा
राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे
राजर्षी शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव पाटील व प्रबोधनकार ठाकरे
राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे
राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे
मराठ्यांचा इतिहास खंड १ : शिवशाही
मराठ्यांचा इतिहास खंड २ : पेशवाई
मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई : खंड १ व २

डॉ.जयसिंगराव पवार यांना मिळालेले पुरस्कार

जिजामाता विद्वत्त गौरव पुरस्कार
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार
कोल्हापूर भूषण पुरस्कार
मालोजी राजे निंबाळकर पुरस्कार
फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार
वीर बाजी पासलकर पुरस्कार
सेनापती प्रतापराव गुजर पुरस्कार
गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार
आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार
सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार.

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आणि मराठेशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात पंचगंगा घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या महिन्यापासून ते फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या जाण्याने इतिहासकार, साहित्यिक, राजकारणी आणि सामान्य वाचकांमध्ये शोककळा पसरली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह राज्यभरातील नेते व लेखकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर गावी एका सामान्य कुटुंबात झाला. गरिबी व संघर्ष असूनही त्यांनी जिद्दीने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून एम.ए. (सर्वोत्कृष्ट) आणि शिवाजी विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी संपादन केली. १९६४ पासून डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करून त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून सेवा दिली.

मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकणारे डॉ. पवार यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे ‘महाराणी ताराबाई’ व ‘राजर्षी शाहू छत्रपती’ ही चरित्रे होत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाविरुद्ध स्वराज्य टिकवण्यात ताराबाईंचा मोलाचा वाटा होता, हे पुरेशा पुराव्यानिशी सिद्ध करून त्यांनी इतिहासाच्या मांडणीला नवे वळण दिले. त्यांनी एकूण ५० हून अधिक ग्रंथ आणि ४५ शोधनिबंध लिहिले असून ‘सेनापती संताजी घोरपडे’, ‘मराठेशाहीचा मागोवा’ यांसारखे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. १२०० पानांचा, तीन खंडांचा ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ संपादित करून त्यांनी तो भारताच्या १६ भाषांसह रशियन, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषांमध्ये अनुवादित केला. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच १९९२ मध्ये स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’चे ते संस्थापक-संचालक व शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत राहिले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून तीन वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवले.

राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाला ऐतिहासिक सल्ले देऊन त्यांनी शाहू मिल आणि खासबाग मैदान यांचे जतन केले. महात्मा फुले व शाहू महाराजांच्या सत्यशोधकी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेले डॉ. पवार हे इतिहासाची तटस्थ आणि मानवी मूल्यांवर आधारित मांडणी करत असत.

गुरुवारी सकाळी १०.०० वाजता ‘शिवतेज’ बंगला, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. साने गुरुजी वसाहत, जुना वाशी नाका, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, खासबाग मैदान, बिंदू चौक, पद्मा टॉकीज, दसरा चौक (राजर्षी शाहू पुतळा), शाहू स्मृतीस्थळ, जुना बुधवार पेठ मार्गे ही यात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली. यावेळी शासन-प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे, तर कोल्हापूरवासीयांच्या वतीने खासदार शाहू छत्रपती यांनी डॉ. पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

याप्रसंगी पोलिसांनी बंदुकीच्या ३ फैरी झाडून त्यांना मानवंदना (सलामी) दिली, तसेच पोलीस धूनही सादर करण्यात आली. यावेळी डॉ. पवार यांच्या कुटुंबातील सदस्य प्रा. डॉ. अरुंधती पवार, डॉ. प्रा. मंजुश्री पवार, पृथ्वीराज पवार आणि रिया पवार तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, पोलीस उपाधिक्षक श्रीमती प्रिया पाटील, होम डीवायएसपी तानाजी सावंत, इतिहास अभ्यासक-संशोधक डॉ.इंद्रजीत सावंत, प्रा. रमेश जाधव, राजेश लाटकर, आझाद नाईकवाडी, माजी महापौर आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाळ पाटणकर, हर्षल सुर्वे, सुरेंद्र जैन, मेधा पानसरे, आदिल फरास, श्रीराम पवार, विजय देवणे, अजेय दळवीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘डॉ. जयसिंगराव पवार अमर रहे’ अशा घोषणा देत हजारो कोल्हापूरवासीयांनी इतिहासाच्या या साक्षेपी अभ्यासकाला श्रद्धांजली अर्पण करून साश्रू नयनांनी अंतिम दर्शन घेतले.आणि अखेरचा निरोप दिला.