महापौर सौ निलोफर आजरेकर यांच्या हस्ते हज यात्रेकरूंचे फॉर्म हज फौंडेशनच्या वतीने मोफत भरण्यास शुभारंभ, महापौरांचा सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी :कोरोना महामारी मूळे यंदाची हज यात्राच रद्द करण्याचा निर्णय सौदी अरेबिया सरकारने घेतला, त्यामुळे लाखो यात्रेकरू नाराज झाले.मात्र आता 2021 सालात हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी भारत सरकार आणि केंद्रीय हज समितीच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य हज कमिटीने हजला जाणाऱ्या यात्रेकरूंची फॉर्म भरून नोंदणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज हज फौंडेशन,कोल्हापूर च्या वतीने मुस्लिम बोर्डिंग येथे महापौर सौ निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आणि कोल्हापूर जिल्हा जमियतचे आमिर हाजी दिलावर मुल्लाणी व मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांच्या उपस्थितीत हज यात्रेकरूंचे फॉर्म भरण्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंचे मोफत फॉर्म भरण्यात आले.त्याचबरोबर हज फौंडेशन च्या वतीने महापौर सौ निलोफर आजरेकर यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या कार्याचा गौरव शाल श्रीफळ देऊन हाजी सायरा मोमीन यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी हज फौंडेशनचे उपाध्यक्ष हाजी बालेचांद म्हालदार, सचिव समीर मुजावर,खजानिस हाजी बाबासाहेब शेख,हाजी इम्तियाज बारगिर,सादत पठाण, हाजी अस्लम मोमीन,इम्तियाज बागवान,हाजी समीर पटवेगार,अनिस बेपारी,इम्रान अत्तार उपस्थित होते.