Friday, July 19, 2024
Home ताज्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीचा ऋषिकेश रामचंद्र जोंधळे शहीद,बहिरेवाडी गावावर ऐन दिवाळीत शोककळा

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीचा ऋषिकेश रामचंद्र जोंधळे शहीद,बहिरेवाडी गावावर ऐन दिवाळीत शोककळा

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीचा
ऋषिकेश रामचंद्र जोंधळे शहीद,बहिरेवाडी गावावर ऐन दिवाळीत शोककळा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्याच्या सवजियानमध्ये पाकिस्तानचे सैन्य व भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी. ता. आजरा येथील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (वय-२०) शहीद झाला.दिवाळी सुरु असताना गावावर शोककळा पसरली.
ऋषिकेश जोंधळे सीमेवर शहीद झाल्याचे सांयकाळी पाचनंतर कळताच गावकऱ्यांना धक्का बसला .                                                        केवळ दोन वर्ष सेवा बजावलेल्या जवान ऋषिकेश शहीद झाला. बेळगाव येथे भरती झाल्यानंतर तो जम्मू – काश्मीर येथे सेवा बजावत होता. शुक्रवारी पहाटे पूँछ जिल्हयाच्या सवजियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात येत होता. शस्त्रसंधीचे उल्लंघन. पाक सैन्याकडून सुरू होते. भारतीय सैन्यांनी चोख उत्तर दिले.
या हल्यात देसाई हा गंभीररित्या जखमी झाला. उपचारासाठी हॅलिकॉप्टरमधून सैन्याच्या दवाखान्याकडे नेत असताना त्याचे निधन झाले . २०१८ मध्ये सहा मराठा लाईफ इन्फट्री मध्ये तो भरती झाला होता. त्याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण बहिरेवाडीत तर ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण गडहिंग्लज येथील साधना विद्यालयात झाले.
बुधवारी जोंधळे आपल्या घरातील आई, वडिल , बहिण यांचेशी बोलला ते अखेरचे बोलणे झाले. लॉकडाऊनच्या काळात जूनमध्ये तो सुट्टीवर आला होता . त्यानंतर तो गावातील जवान विनायक कोपटकर ऑगष्टमध्ये जम्मू – काश्मीर येथे सेवा बजावण्यासाठी गेले . ते दोघे एकाच युनिटमध्ये होते.पार्थिव रविवारी येण्याची शक्यता
जोंधळे यांचे पार्थिव गावात रविवारी येण्याची शक्यता असून बाहेरेवाडी हायस्कूलच्या मैदानावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार होणार आहेत .
गावातील दुसरा जवान शहीद
जम्मू काश्मीर मध्ये प्रविण जानबा येलकर हे २०१७ मध्ये शहीद झाले होते. त्यानंतर जोंधळे हे शहीद झाले.आई, बहीण, वडीलांचा आक्रोश
आपला मुलगा शहीद झाल्याचा फोन मित्राकरवी रामचंद्र शेवाळे यांना आला अन् त्यांना एकच धक्का बसला. आई, बहीण यांचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. घरासमोर एकच गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments