Thursday, November 21, 2024
Home ताज्या तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील भव्य "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास आजपासून प्रारंभ

तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास आजपासून प्रारंभ

तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास आजपासून प्रारंभ

-चार दिवस चालणार प्रदर्शन

-देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे हे पाचवे प्रदर्शन आजपासून सुरू होत असून २५ डिसेंबर २०२३ पर्यंत ते खुले आहे.      प्रदर्शनात अडीचशेहून अधिक स्टॉल, दोनशे पेक्षा अधिक पशु पक्षी जनावरे यांचा समावेश असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. या प्रदर्शनाचे उदघाटन उद्या २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, संपर्कप्रमुख विजय देवणे, आर.के. पोवार, सचिन चव्हाण, सुनिल मोदी आदीं उपस्थित राहणार आहेत.          या प्रदर्शनात देश – विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यामध्ये तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, २०० पेक्षा अधिक पशु-पक्ष्यांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बि-बियाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.                                          यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बि-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत. या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत.प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा पशुस्पर्धांची बक्षीसही दिले जाणार आहेत. आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे. तांदूळ महोत्सवात तांदूळ शेतकऱ्यांकडून थेट विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. तर पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन आणि हायड्रोलिक चारा तयार करणे, विविध प्रकारचे जनावरे पशुपक्षी पहावयास मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले आहे.

उदघाटक प्रताप.र.चिपळूणकर यांचा परिचय.

प्रताप र.चिपळूणकर हे शेती पदवीधर होऊन प्रत्यक्ष शेतीस प्रारंभ ते आजतागायत ५० वर्षे पूर्ण वेळ शेतकरी आहेत. शेतात वेगवेगळे प्रयोग करीत असता अनेकदा नुकसान होऊनही त्यांचे प्रयोग अव्याहतपणे सुरू आहेत.जमिनीची सुपिकता वाढविणे, उत्पादन वाढविणे, उत्पादनाचा दर्जा वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे या चार सूत्रांवर आधारित शेतीचे व्यवस्थापन व उत्पादन खर्च कमी करण्याचे मार्ग त्यांनी विकसित केले आहेत.नांगरणी बंद अगर गरजेपुरतीच, कमी रासायनिक खत वापर, उसाची खोडकी, तण जागेलाच कुजवून जमिनी सुपिकतेचे प्रयोग,कमी पाणी, कमी मजूर, कमी औजारांचा वापर, दर्जेदार, रसायनविरहित गूळ, काकवी उत्पादन व स्वतः विक्री, अनेक वर्तमानपत्रे, मासिकांतून विपुल लेखन, शेतकरी मेळाव्यातून मार्गदर्शन असे चिपळूणकर यांचे कार्य आहे.

त्यांची प्रकाशित साहित्य अशी आहेत

कमी खर्चाची ऊसशेती
ऊसाचे शरीरशास्त्र
जमिनीची सुपीकता
फायदेशीर भात शेती
तण देई धन
बिना नांगरणीची शेती
संवर्धित शेती भार
चिपळूणकर कृषी तंत्रज्ञान,जमीन व्यवस्थापन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments