गोकुळ दूध संघ व दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनीकडून दूध उत्पादक शेतक-यास दिलासा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि., यांचे संयुक्त विद्यमाने फार्मर्स विमा पॅकेज पॉलिसी दिली जाते. त्यामध्ये दोन दुभती जनावरे, दूध उत्पादक शेतकरी (पती-पत्नी), राहते घर, वासरु संगोपन योजने अंतर्गत असणारी दोन वासरे व बायोगॅस यांना विमा सुरक्षा दिली जाते.
दि न्यू इन्डिया एश्योरंन्स कंपनीमार्फत देणेत येणारी किसान विमा पॉलिसी ही दोन प्रकारे दिली जाते.
त्यातील रुपये ७७० इतक्या किमतीस दिल्या जाणा-या पॉलिसीमध्ये रुपये ४६२ हे दूध उत्पादकांनी भरावयाचे असून त्यात समान दहा हप्ते करुन दूध बिलातूनघेणेची सवलत दिली आहे.उर्वरीत रक्कम रुपये १५४ दूध संस्थेमार्फत व रुपये १५४ हे गोकुळ दूध संघामार्फत भरले जातात तर दुसरी पॉलिसी रुपये १६०० इतक्या किमतीस दिली जाते त्यापैकी रुपये ९६० हे दूध उत्पादकांनी भरावयाचे असूनत्यातही समान दहा हप्ते केले आहेत. उर्वरीत रक्कम रुपये३२० दूध संस्थेमार्फत व रुपये३२० हे गोकुळ दूध संघामार्फत भरले जात असून पॉलिसी अंतर्गत दोन दुभत्या जनावरांकरीता ७७० रुपयाच्या पॉलिसी करीता २० हजार रुपयेतर १६०० रुपयाच्या पॉलिसीकरीता ४० हजार रुपये, पती-पत्नीस अपघाती विमा कवच १ लाख रुपये, राहत्या घरास १ लाख रुपये, दोन वासरां करीता प्रत्येकी रुपये ५ हजार व गोबर गॅसकरीता रुपये २० हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
सध्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्वञ लॉकडाऊन असतानासुध्दा माहे एप्रिल २०२० पासून आजअखेर ६० लाख रुपयांची नुकसान भरपाई या पॉलिस अंतर्गत देण्याचे काम गोकुळ दूध संघ व दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनीने केले आहे.
या योजनेत सहभाग घेतलेले यशवंत सहकारी दूध संस्था पुनाळ, ता.पन्हाळा संस्थेचे दूध उत्पादक शेतकरी कै.विलास मारुती पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला तसेच दत्त सहकारी दूध सांगरुळ,ता.करवीर दुध संस्थेचे दूध उत्पादक शेतकरी कै. तानाजी शिवाजी वाघवेकर यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्यामुळे या फार्मर्स विमा पॅकेज योजनेतुन प्रत्येकी रुपये एक लाख रुपयाचा अपघाती विमा मिळाला असून हनुमान दूध संस्था मौजे वडगांव, ता.हातकणंगले या दूध संस्थेतील १३ दूध उत्पादकशेतक-यांच्या जनावरांचा मृत्यु झाल्यामुळे प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे ५ लाख २० हजार रुपये, साईबाबा दूध संस्था चौधरवाडी,ता.गगनबावडा २ दूध उत्पादक शेतक-यांच्या जनावरांचा मृत्यु झाल्यामुळे १ लाख रुपये असा ८ लाख २० हजार रुपये विमा रक्कमेच्या धनादेशाचे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सभेचे अध्यक्ष गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.अरुण नरके यांच्या हस्ते व इतर संचालक मंडळांच्या उपस्थितीत वितरण करणेत आले.
यावेळी दि न्यू इन्डिया एश्योरंन्स कंपनी व उपस्थित दूध संस्था मार्फत गोकुळने राबविलेल्या या योजनेबद्दल कौतुक व्यक्त करुन संघाच्या सहकार्याबद्दल सभेचे अध्यक्ष माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.अरुण नरके यांचा सत्कार केला.
यावेळी विमा रकमेचा धनादेश दूध संस्था प्रतिनिधीना सुपूर्द करताना सभेचे अध्यक्ष माजी चेअरमन व जेष्ठ मा.श्री.अरुण नरके, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक सर्व श्री.रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, रामराज देसाई-कुपेकर,बाळासो खाडे, आमदार राजेश पाटील, पी .डी.धुंदरे, उदय पाटील, सत्यजित पाटील, विजय तथा बाबा देसाई, विलास कांबळे,अमरीशसिंह घाटगे, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर(माई), कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम .पाटील,दूध संस्थाचे प्रतिनिधी, दि न्यू इन्डिया एश्योरंन्स कंपनीचे वरिष्ठ मंडल प्रबंधक जी.भुवनेश्वरी, के.वाय.पाटील, पी.एम.कालेकर, कानेटकर, शुभम पुनवकर, व इतर मान्यवर उपस्थित होते.