गटनेते शारंगधर देशमुख यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पुराने पडलेली ३ घरे दिली बांधून – पूरग्रस्तांना दिल्या मान्यवरांच्या हस्ते चाव्या
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेतील कॉग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करता २०१९ च्या पुरामध्ये लक्ष्मीपूरी कामगार चाळ येथील पडलेली तीन घरे बांधून दिली. या नविन बांधण्यात आलेल्या तीन घरांच्या चाव्या संबंधितांना देण्याचा लोकार्पन सोहळा आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर सौ.निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, गणी आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाढदिवसाचा निधी पूरग्रस्तांची घरे उभारण्यासाठी दरवर्षी ६ सप्टेंबर रोजी गटनेते शारंगधर देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात कार्यकर्ते साजरा करतात. परंतू सन २०१९ मध्ये कोल्हापूर शहरात महापूराने थैमान घातले होते. कोल्हापूरातील बऱ्याच नागरिकांना महापूराचा फटका बसला होता अशा वेळेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे निश्चीत केले होते. त्याप्रमाणे श्री. वसंतराव ज.देशमुख हायस्कूल, तेजस मुक्त विद्यालय, सन्मित्र विद्यालय व देशमुख इंग्लिश मिडीयम या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच शारंगधर देशमुख वाढदिवस समिती व समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करुन जमा झालेल्या निधीतून लक्ष्मीपुरी येथील तीन पूरग्रस्त कुटुंबांची पडलेली घरे बांधण्यात आली. ही घरे आज जयश्री जावीद, अनिता पंडत, किरण कांबळे यांना आज मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
आजरेकर फौंडेशनच्यावतीने डॉ.आंबेडकर भवन इमारत व हायमास्क दिव्यांची उभारणी
यावेळी आजरेकर फौंडेशनच्यावतीने लक्ष्मीपूरी येथील रिलायन्स मॉल जवळील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला क्रिंडा व सांस्कृतीक भवनची इमारत आजरेकर फौंडेशनने स्वखर्चाने नुतनीकरण करुन दिली आहे. तसेच याठिकाणी महापौर सौ. निलोफर आजरेकर यांच्या निधीतून हायमास्क दिवा बसविण्यात आला आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला क्रिंडा व सांस्कृतीक भवनच्या नुतनीकरण केलेल्या इमारतीचे व हायमास्क दिव्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी सर्व मान्यवरांचे आजरेकर फौंडेशनच्या वतीने अध्यक्ष आश्पाक आजरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रास्ताविकात महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी गटनेते शारंगधर देशमुख यांनी आपला वाढदिवस साजरा न करता आपल्या भागामध्ये पुरग्रस्तांना मदत केल्याबददल त्यांनी आभार व्यक्त केले. प्रभागामध्ये पुराचा मोठयाप्रमाणात फटका बसला होता. यावेळी महापालिकेने पुर कालावधीत फार चांगले काम केले आहे. प्रभागामध्ये रस्ते, गटर्स, ड्रेनेज लाईन व क्रॉसड्रेन अशी बरिचशी कामे पुर्णत्वास आली. भागातील नागरिकांनी आपल्याला वेळोवेळी मदत केलेली आहे.
गटनेते शारंगधर देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले, २०१९ साली ज्यावेळी मोठया प्रमाणात महापुर आला त्यावेळी आम्ही सर्व नगरसेवक रात्रदिवस लोकांच्या मदतीला होतो. २०१९ साली मोठया प्रमाणात पुर आलेने मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला, आमच्या देशमुख शाळेतील स्टाफ, विघ्यार्थी, विघ्यार्थीनी, कार्यकर्ते व भागातील मंडळे, मित्रपरिवार यांच्या सहकार्याने पुरामघ्ये पडझड झालेली तीन घरे मी बांधू शकलो. ज्यावेळी सहकार्याची व दातृत्वाची साथ मिळते त्यावेळी आपण काहितरी यशस्वीरित्या करु शकतो, असेही ते म्हणाले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, शारंगधर देशमुख यांनी ही घरे बांधून उल्लेखनीय काम केले आहे. सर्व सदस्यांनी पुरावेळी प्रामाणीकपणे काम केले. महापौर सौ.निलोफर आजरेकर या महिला असून सुध्दा त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले. त्या कोठेही कमी पडल्या नाहीत. त्या कायम कामात राहील्या. आपण सर्वजन गेले सात महिने कोरोनाशी लढा देत आहोत. अजुनही कोरोना पुर्णत: गेलेला नाही. त्यामुळे सर्वानी मास्क लावावा, सोशल डिस्टन्स पाळावे, सर्वानी काळजी घ्यावी, शहराच्या विकासासाठी सर्वानी कुटूंब म्हणून एकत्रीत येवून काम करुया, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, जेथे जेथे अडचण येते तेथे शारंगधर देशमुख मदत कार्यात पुढेच असतात. ते कधीही काम करण्याची संधी सोडत नाहीत. चालू वर्षी आपण सर्व मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुर नियंत्रीत ठेवू शकलो. पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका यांच्या मध्ये समन्वय राहिल्याने पुराची लेव्हल आपण नियत्रीत करु शकलो. शहराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी आवश्यकती सर्व मदत आम्ही करु स्वच्छ सुंदर व कोंडाळामुक्त करुया.
यावेळी देशमुख हायस्कूलचे व्ही. एस. पटकुरे, पी. एस. जाधव, तेजस मुक्त विघालयाचे डी.व्ही.पाटोळे, एस. व्ही. चिचेवाडे, सन्मित्र विघालयाचे एस. व्ही. भोसले, देशमुख इंग्लीश मेडियम सुरेश कांबळे, बेसमेंन्ट कटटाग्रुपने मदत केल्याबद्दल व देवराज बोटींग क्लब यांनी पुरामध्ये बोटी उपलब्ध करुन दिल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
आजरेकर फौडेंशनचे अध्यक्ष अशपाक आजरेकर यांनी आभार मानले व ते म्हणाले की, महापालिकेची असलेली कामगार चाळ इमारत बांधण्याचा आमचा मानस असून येत्या दोन ते तीन महिन्यात महापालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करु, तसेच प्रभागातील ९५ टक्के कामे पुर्ण करु शकलो याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी संजय कदम, संजय तोरस्कर, विकी कांबळे, विकास माजगावकर, सदानंद दिघे, समाधान कांबळे, श्रीकांत पंडत, विनोद पंडत व भागातील नागरीक व कार्यकर्ते उपस्थित होते.