Sunday, July 14, 2024
Home ताज्या शाहु स्मारक येथे महापालिकेचे पोस्ट कोव्हिड केंद्र सुरु,कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना त्रास...

शाहु स्मारक येथे महापालिकेचे पोस्ट कोव्हिड केंद्र सुरु,कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना त्रास झाल्यास ‍मिळणार दिलासा-महापौर

शाहु स्मारक येथे महापालिकेचे पोस्ट कोव्हिड केंद्र सुरु,कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना त्रास झाल्यास ‍मिळणार दिलासा-महापौर

कोल्हापूर/प्रतिनिधी  : महानगरपालिकेच्यावतीने सुरु केलेल्या पोस्ट कोव्हिड केंद्राचे उदघाटन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.येथील शाहु स्मारक भवन येथे सुरु केलेल्या या पोस्ट कोव्हिड केंद्रांच्या उदघाटन कार्यक्रमास महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते राहुल चव्हाण, उपायुक्त निखिल मोरे, युवराज दबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने, डॉ. रमेश जाधव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.                    कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास महानगरपालिकेच्यावतीने सुरु केलेल्या पोस्ट कोव्हिड केंद्रामध्ये त्यांच्यासाठी उपचाराच्या व समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे सांगून महापौर सौ. निलोफर आजरेकर म्हणाल्या, या केंद्रामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास त्यांच्यासाठी तपासणी, उपचार आणि संदर्भ सेवा देण्याबरोबरच फिजिओथेरपी तसेच मानसिक आधारासाठी समुपदेशनाचे कामही केले जाणार आहे. या केंद्रामध्ये नागरिकांसाठी रुग्ण नोंदणी कक्ष, नसिंग कक्ष, औषध कक्ष, डॉक्टर कक्ष, तपासणी कक्ष आणि प्रतिक्षा कक्ष अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

पोस्ट कोव्हिड केंद्रासाठी सर्व सुविधा प्राधान्याने … आयुक्त डॉ. बलकवडे

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी व दिलासा देण्यासाठी महापालिकेचे पोस्ट कोव्हिड केंद्र उपयुक्त ठरेल, असे सांगून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, या केंद्रासाठी सर्वत्या सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सद्या कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, कोराना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कायम मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दीत जाणे टाळणे आणि कोरोनाची लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घेण्याचा सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला आहे.केंद्र स. 8 ते रात्री 8 पर्यंत सुरु : दु. 1 ते 3 तज्ञ डॉक्टरांचा सल्ला कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शाहु स्मारक भवन येथे सुरु केलेले पोस्ट कोव्हिड केंद्र रविवार वगळता आठवडयाचे सातही दिवस सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कार्यरत राहील. दररोज दुपारी 1 ते 3 यावेळात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले. या केंद्रामध्ये डॉक्टर्स, फिजिओथेरपी,समुपदेशन, नर्सिंग स्टाफ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पोस्ट कोव्हिड केंद्रांची मदत घेण्यसाठी नागरिकांनी 0231-2542601 या दुरध्वनीवरुन कोव्हिड वॉर रुमशी संपर्क साधावा.

पोस्ट कोव्हिड केंद्रात बाहय रुग्णसेवा

पोस्ट कोव्हिड केंद्रामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी बाहय रुग्णसेवा मिळणार असून आवश्यकतेनुसार सीपीआरमध्ये संदर्भ सेवा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने यांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोना होऊन गेल्यानंतर रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास या केंद्रात मोफत तपासणी, उपचार, समुपदेशन, मार्गदर्शन आणि सीपीआरची संदर्भ सेवा याबाबत कार्यवाही केली जाणारआहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, जनेआजारांनी उग्र स्वरुप धारण करणे, अनाहूत भिडी, दडपण येणे, मानसिकदृष्टया खचणे, दम लागणे, छातीत धडधड वाढणे, हदयाचे आजार, साखरेचे आजार, निद्रानाश, चव जाणे, वास न येणे, एकाग्रता भंग अशा त्रासांबाबत तपासणी, उपचार, समुपदेशन आणि संदर्भ सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.                                          यावेळी महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी या केंद्राची पाहणी करुन दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. या कार्यक्रमास आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, शाहु स्मारक भवनचे युवराज कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित हेाते.न्यु कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून 8 लाखाचे वैद्यकीय साहित्य येथील न्यु कॉलेजच्या (सायन्स) 1990 ते 1992 च्या बॅचमधील 80 विद्यार्थ्यांच्या ग्रुपने शाहु स्मारक भवन येथील कोरोना केअर सेंटरसाठी 8 लाखाचे वैद्यकीय साहित्य उपलबध करुन दिले आहे. यामध्ये 23 बेड, अंथरुण, पांघरुण तसेच ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठीची लाईनचा समावेश आहे. याही कक्षाची महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी करुन देणगीदारांचे आभार व्यक्त केले.                         न्यु कॉलेजच्या (सायन्स) 1990 ते 1992 च्या बॅचमधील 80 विद्यार्थ्यांचा ग्रुपमधील अनेक विद्यार्थी परदेशातही कार्यरत असून आज डॉ. संदीप पाटील, डॉ. हरिष नागरे, डॉ. कानडे, राजेंद्र पाटील (कतार), रवी सातपुते (अबुधाबी), हसिना कक्कर (दुबई), नितीन कवडे, प्रताप इंदुलकर, डॉ. संदीप पाटील, डॉ.अभया नरुटे, सौ. शितल पाटील, सर्जेराव पाटील (ऑस्टेलिया), किशोर अतिग्रे (अमेरिका), मनोज दिक्षित, अनघा घोटणे, सागर शिरगुप्पे (बेंगलोर), कविराज शिंदे तसेच अन्य सर्व ग्रुपचे सहकार्य लाभल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments