Thursday, November 21, 2024
Home ताज्या गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी एकी जपा महाराष्ट्राची एकी कोणी तोडू...

गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी एकी जपा महाराष्ट्राची एकी कोणी तोडू नाही शकणार असा दिला संदेश

सतेज कृषी प्रदर्शनात “जय जवान,जय किसन”चा नारा देत गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी एकी जपा महाराष्ट्राची एकी कोणी तोडू नाही शकणार असा दिला संदेश

मोदी सरकारच्या काळात नोकऱ्या मिळणे कठीण, तरुणांनो सतेज कृषी प्रदर्शन पहा व शेती व्यवसायात पुढे या – आमदार हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कमी खर्चात शेतीतून जास्त उत्पादन करणे हेच भविष्य काळातील शेतकऱ्यांचे सूत्र असणार – आमदार सतेज पाटील यांचे उदगार

कोल्हापूर/प्रतिनिधी : मी लहानपणापासून शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार ऐकत आलो आहे. आज मात्र काही राजकीय लोक व पक्ष फुले आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या बाबत उलट सुलट बोलत आहेत.खऱ्या अर्थाने शाहू महाराज,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतांनी कधीही जाती व्यवस्थेविरोधात बोलले नाहीत.मात्र आज काही राजकीय नेते व पक्ष या शाहू,फुले आणि आंबेडकर यांचे विचार संपवण्याचा कट करत आहेत. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.याबाबत विचार करण्याऐवजी या थोर विचारवंतांवर उलटसुलट बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकी हीच आपली खरी ताकद आहे. ही एकी जपा असे उदगार काँग्रेसचे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी सतेज कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी काढले.
येथील तपोवन मैदानावर या सतेज कृषी प्रदर्शनास आजपासून आमदार जिग्नेश मेवानी यांच्या हस्ते फीत कापून शानदार प्रारंभ झाला आहे.यावेळी झालेल्या उदघाटन कार्यक्रमात आमदार मेवानी यांनी आमदार सतेज पाटील यांना आपण भरवत असलेले शेतकऱ्यांसाठीचे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांनासाठीचे चांगले व्यासपीठ आहे. असाच उपक्रम मीही गुजरातमध्ये राबविणार असून आपल्या इकडच्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाची माहितीची देवाणघेवाण करून देऊया असे सांगितले.यावेळी अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.
यावेळी सतेज कृषी प्रदर्शनात “जय जवान,जय किसन”चा नारा देत गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी एकी जपा महाराष्ट्राची एकी कोणी तोडू नाही शकणार असा संदेशही उपस्थित शेतकऱ्यांना दिला.शाहू महाराज यांचे विचार अतिशय प्रगतीशील होते. आणि गुजरात मध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे.शेतकरी आणि मजुरांच्या हातात सत्ता म्हणजे क्रांती परंतु आता उद्योगपतींच्या हातात सत्ता आहे. गुजरात येथील माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांना देखील कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या पॅटर्न व तंत्रज्ञानाचा फायदा होईल आपल्या एकसंघतेला कोणी तोडता कामा नये तरच प्रगती होईल असे उद्गार काढले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा आहे. कोल्हापूर हे शाहू महाराज, कुस्ती आणि शर्यत या तीन गोष्टीसाठी प्रसिद्ध असून अलीकडे शेतीमध्ये जमिनीचे तुकडे होत चालले आहेत. त्यामुळे जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि शेतकरी जगविने ही आता आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून शेतकऱ्यांनीही आपल्या जमिनीमधून केवळ ऊस आणि सोयाबीन हीच पिके वारंवार न पिकविता आता वेगवेगळी पिके पिकविणे आवश्यक असल्याचे सांगितले.आता मोदी सरकारच्या काळामध्ये नोकरी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे तरुणांनी शेतीवर अधिक भर देणे आवश्यक आहे.त्यासाठीच सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये आमचे पॅनल आम्ही निवडून आणले आहे.दुधाची मागणी वाढली आहे.आम्ही शेतकऱ्यांना दूध दर वाढवून दिले आहेत. शिवाय दूध पावडर मध्ये ही फायदा झाला आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांनी व शेतकरी तरुणांनी म्हैशीच्या आणि गाईचे उत्पादन हाही जोडधंदा सुरू केला पाहिजे असे सांगितले.
यावेळी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात आमदार सतेज पाटील यांनी.भविष्यकाळातल्या काम करणाऱ्या शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान दाखविणे असे हे एक व्यासपीठ आपण या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध केल्याचे सांगून, आम्ही या प्रदर्शनाच्या निमित्ताने काही नवीन तंत्रज्ञान नव्या संकल्पना म्हणजे हातकणंगल्यामध्ये अँकवा फोनिक शेती या पद्धतीचा एक नवीन तंत्रज्ञान आलेला आहे आपण दाखवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना या ठिकाणी केला आहे. वर्टीकल फार्मिंग ची संकल्पना आता देशामध्ये त्या ठिकाणी आलेल्या आणि या सगळ्या नव्या गोष्टी आपल्या तरुण शेतकऱ्यांच्या पुढं नव्या शेतकऱ्यांच्या पुढे जुन्या शेतकऱ्यांच्या पुढे जाव्यात हा उद्देश या प्रदर्शनाचा असल्याचे सांगितले.या प्रदर्शनातुन शेतकऱ्यांनी चांगले काहीतरी घेऊन जावे हीच अपेक्षा असल्याचे सांगितले.
भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो व यातील महाराष्ट्र राज्य कृषी प्रधान म्हणून ओळखलं जातं आणि आपला कोल्हापूर जिल्हा देखील कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यामध्ये आघाडीवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू आहेत. शंभर टन ऊस काढण्याची क्षमता असणारा शेतकरी या कोल्हापूर जिल्ह्याने त्या ठिकाणी पाहिले आणि म्हणून सामान्य माणूस या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे आहे त्या जमिनीतून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे करता येईल हेच भविष्यकाळातलं सूत्र असणार आहे आणि ते सूत्र या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिळावं हा प्रामाणिक उद्देश आमचा निश्चितपणे असल्याचे सांगितले.
या ठिकाणी आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.तर दुसऱ्या बाजूला गोकुळच्या माध्यमातून दुधाला चार पैसे जास्त मिळाले पाहिजेत ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी घेत असतो. कारण की उद्देश एवढाच आहे की आज हे दोन धंदे आहेत शेतीतलं उत्पन्न आणि दुधाचे उत्पन्न या दोन उत्पादनातूनच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी दिवाळी साजरी होणार आहे. आणि म्हणूनच या दोन्ही उद्देशाने या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मार्ग उपलब्ध व्हावा हा प्रामुख्याने उद्देश या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी या कृषि प्रदर्शनाला अवश्य भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञान व माहिती जाणून घ्यावी असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर मा.आ. श्रीमती जयश्री जाधव, मा.आ. जयंत आसगावकर ,
मा. डॉ. संजय डी. पाटील,श्री. के. पी. पाटील ,मा.श्री. बजरंग देसाई,मा. श्री. सुरेश साळोखे,मा. श्री. सत्यजित पाटील-सरुडकर,मा. श्री. संजय घाटगे,मा. श्री. राजीव आवळे,मा. श्री. विश्वास पाटील,मा. श्री. संजय पवार,मा. श्री. विजय देवणे, मा. श्री. मुरलीधर जाधव,मा. गुलाबराव घोरपडे,मा. व्ही बी पाटील,मा. श्री. कर्णसिंह गायकवाड, मा. श्री. सत्यजित जाधव,मा. श्री. अमरसिंह पाटील,मा. श्री. सुनिल शिंत्रे,
मा. श्री. सचिन चव्हाण, मा. श्री. प्रताप उर्फ भैय्या माने,मा. श्री. तेजस सतेज पाटील,मा. शशांक बावचकर,
मा. विनोद पाटील,मा. धीरज पाटील
गोकुळचे संचालक, माजी नगरसेवक, नगरसेविका, मा जि प, पं स सदस्य, शेतकरी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments