Monday, July 15, 2024
Home ताज्या छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला ( नांदेड ) मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद

छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला ( नांदेड ) मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद

छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला ( नांदेड ) मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शाखांचे उद्घाटन ,मेळावे ,जाहीर सभा, कोपरा सभा घेत छत्रपती संभाजीराजेंनी राजकीय मोट बांधणीस सुरुवात केल्याचे दिसत आहे.गेले दोन तीन दिवस नांदेड दौऱ्यादरम्यान स्वराज्य संघटनेच्या जवळपास ७० शाखांचे उद्घाटन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर व हदगाव तालुक्यात स्वराज्य संघटनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शुक्रवार दि. २३ व शनिवार दि. २४ रोजी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक गावात अनोख्या पद्धतीने स्वराज्य चे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवसाच्या सांगता सभेमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी स्थानिक प्रश्नांसोबतच विधानसभेत होत असलेल्या गदारोळाविषयी भाष्य करताना सरकार सह विरोधकांवर निशाना साधला.
काल शेतकरी दिन असून देखील शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचे भाष्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले. सोबतच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत स्वराज्य ला मिळालेल्या विजयामुळे स्वराज्य ने राजकारणात यावे ही लोकांची भावना असल्याचे बोलत स्वराज्य बाबत राजकीय संकेत दिले.
अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे संभाजीराजेंनी टिका केली. युवकांच्या प्रतिसादामुळे बऱ्याच ठिकाणचे कार्यक्रम वेळेपेक्षा दोन ते अडीच तास उशीराने होत होते. गावच्या गाव शाखा उद्घाटन सोहळ्यास उपस्थीत राहत आहेत.गावातील तरुन , विद्यार्थी , महीला , पुरुष , जेष्ठ एक दिल्याने उपस्थीत राहील्याने गावो गावी छत्रपती संभाजीराजेंना सभा घ्याव्या लागल्या.
गावाच्या प्रवेश द्वारा पासुन गावठांना पर्यंत वाजत गाजत ग्रामस्थ मिरवणुक काढत आहेत.अनेक गावांत ग्रामस्थ स्वराज्य संघटने ऐवजी पक्षात रुपांतर करण्याची मागणी करीत आहेत. सध्या महाराष्ट्रात २० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्य निवडुन आल्याने छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकाकी राजकीय चाचपनी देखील करीत आहेत. स्वईछेने जर पॅनल निवडुन येतात तर जाहीर केल्या मोठा प्रतिसाद असेल हे नाकारता येत नाही.या दौऱ्यापुर्वी रायगड , नाशिक , परभणी आत्ता नांदेड जनतेने प्रचंड प्रतिसाद स्वराज्य संघटनेला दिला आहे.महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्य नवीन राजकिय पर्याय उपलब्ध होऊ शकतो असे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॅा धनंजय जाधव म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments