भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोकुळ मार्फत अभिवादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील, संचालक युवराज पाटील व अधिकारी यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. भविष्यातही त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली मूल्ये निश्चितच प्रेरणादायी असतील आणि एखाद्या दीपस्तंभासारखी आपल्याला मार्गदर्शक ठरतील. यावेळी गोकुळ परिवाराच्या वतीने बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी गोकुळचे चेअरमन श्री. विश्वास पाटील, संचालक युवराज पाटील, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.यु.व्ही.मोगले, संकलन सहा.व्यवस्थापक दत्ता वाघरे, एम.पी.पाटील,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.