Thursday, December 26, 2024
Home ताज्या भारत जोडो योत्रेला महाराष्ट्रात प्रचंड जनसमर्थन, शेगावमध्ये अभूतपूर्व सभा - नाना पटोले

भारत जोडो योत्रेला महाराष्ट्रात प्रचंड जनसमर्थन, शेगावमध्ये अभूतपूर्व सभा – नाना पटोले

भारत जोडो योत्रेला महाराष्ट्रात प्रचंड जनसमर्थन, शेगावमध्ये अभूतपूर्व सभा – नाना पटोले

भारत जोडो यात्रेने देशात परिवर्तन होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही

पदयात्रेमुळे निर्माण झालेले काँग्रेसमय वितावरण राज्यभर कायम ठेवू

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विदर्भात जलसंधारणाची मोठी कामे व्हायला हवी – जयराम रमेश

बुलढाणा दि. १९ नोव्हेंबर/प्रतिनिधी : राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून निघालेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारधारेला माननारे राज्य आहे. या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपाने निर्माण केलेली भिती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड जनसमर्थन तर मिळालेच पण शेगावमध्ये अभूतपूर्व अशी विराट सभा झाली व राज्यातील जनतेने राहुलजींवर प्रेम व विश्वास व्यक्त केला. या पदयात्रेमुळे निर्माण झालेले काँग्रेसमय वितावरण राज्यभर कायम ठेवू, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
बुलढाणा जिल्ह्यातील जलंब येथील भारत जोडो यात्रेच्या कॅम्पमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, भारत जोड़ो यात्रा आता जनआंदोलन झाले आहे आणि ही यात्रा आता कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेने देशात परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट झाले असून खोटे बोलून सत्तेत आलेल्या व नंतर जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सरकार जनताच खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. ही पदयात्रा विशाल होईल व जनतेचे मोठे समर्थन मिळेल असे मी दोन महिन्यापासून सांगत होतो तेव्हा विरोधक आमची खिल्ली उडवत होते पण देगलूरपासून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत मिळालेले जनसमर्थन राहुलजी गांधी व काँग्रेसवरचा विश्वास दृढ करणारे ठरले आहे. आता देशात परिवर्तन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
यावेळी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेला महाराष्टातून मोठा प्रतिसाद मिळाला. शेगावची सभा ही भारत जोडो यात्रेवर प्रेम व विश्वास दाखवणारी विशाल सभा झाली. सभेसाठीची २२ एकर जागा दुपारीच फुल्ल झाली होती. राहुलजी गांधी यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक या सभेसाठी आले होते.आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, स्व. इंदिराजी गांधी यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने पदयात्रेत महिलांचा सहभाग मोठा होता. बंजारा समाजाच्या ७ ते ८ हजार महिला दुपारच्या सत्रात पदयात्रेत सहभागी होऊन नारीशक्तीचे प्रदर्शन घडवतील. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या दिवशी मागील वर्षी मोदी सरकारला काळे कृषी कायदे रद्द करावे लागले. स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी एवढे मोठे आंदोलन केले त्यात ७०० शेतकरी शहिद झाले अखेर मोदी सरकारला झुकावे लागले व ते काळे कायदे रद्द करावे लागले. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय असून या निमित्ताने ‘शेतकरी विजय दिवस’ पाळला पाहिजे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या संदर्भात वारंवार विचारणी केली जाते की यावर उपाय काय? शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाची कामे या भागात मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला तर विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यम विभागाच्या महिमा सिंह उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments