Monday, November 11, 2024
Home ताज्या संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याच्या कार्यक्रमाची राहुल गांधींच्या हस्ते सुरुवात

संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याच्या कार्यक्रमाची राहुल गांधींच्या हस्ते सुरुवात

संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याच्या कार्यक्रमाची राहुल गांधींच्या हस्ते सुरुवात

काँग्रेसच्या एस. सी. विभागाचे ‘संविधान बचाव’ जनजागृती अभियान

बुलढाणा, दि. १९ नोव्हेंबर/प्रतिनिधी : केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागील ८ वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. लोकशाही व संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्या पुढाकाराने संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते आज करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोटीया, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी. एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबारे, जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारताला दिले. या संविधानाच्या अधिन राहून लोकशाही व्यवस्थेचा कारभार देश स्वतंत्र झाल्यापासून सूरु आहे. संविधानाने सर्व जाती धर्मांच्या लोकांचे हक्क अबाधित ठेवले आहेत. विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख कालपर्यंत अबाधित होती पण मागील 8 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे सरकार केंद्रात आल्यापासून संविधान व लोकशाही मोडीत काढण्याचे काम सुरू आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले हे संविधान अबाधित रहावे व लोकशाहीचे रक्षण व्हावे यासाठी जनजागृती करण्यासठी संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचे अभियान काँग्रेसच्या एस. सी. विभागाने हाती घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी...

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त...

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर...

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे...

Recent Comments