Sunday, July 14, 2024
Home ताज्या गुंतवणुकीच्या नावाखाली कामगारांचं रक्त शोषण्याला आमचा ठाम विरोधच - आमदार हसनसाहेब मुश्रीफ...

गुंतवणुकीच्या नावाखाली कामगारांचं रक्त शोषण्याला आमचा ठाम विरोधच – आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा प्रहार

गुंतवणुकीच्या नावाखाली कामगारांचं रक्त शोषण्याला आमचा ठाम विरोधच – आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा प्रहार

अन्यायी कामगार कायद्याविरोधात रस्त्यावरील लढ्यातून संघर्षाची तयारी ठेवा

आयटकच्या कोल्हापुरातील तीन दिवसीय महाराष्ट्र अधिवेशनाचे उद्घाटन उत्साह

समाजातील शोषित, पीडित, वंचितांचे काम करणाऱ्यांना केला लाल सलाम

कोल्हापूर/प्रतिनिधी : गुंतवणुकीच्या नावाखाली कामगारांचं रक्त शोषण्याला आमचा ठाम विरोधच आहे, असा प्रहार माजी ग्रामविकास व कामगार मंत्री, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केला. केंद्र सरकारच्या अन्यायी कामगार कायद्यांविरोधात रस्त्यावरील लढ्यातून संघर्षाची तयारी ठेवा, असेही ते म्हणाले.आयटकच्या कोल्हापुरातील तीन दिवसीय महाराष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत कामगार विरोधी धोरणे करायची आणि उद्योगपतींना लाल कार्पेट अंथरून गुंतवणुकीसाठी आणायचे नाटक करायचे, अशा प्रकारचे उद्योग या देशात सुरू आहेत. गुंतवणूकीसाठी उद्योजकांना आकर्षक सवलती देण्याबद्दल आमच्या हरकती असायची गरज नाही. परंतु; कामगारांचं रक्त शोषून घेऊन अशा प्रकारच्या गुंतवणुकी येण्याला आमचा ठाम विरोधच आहे.
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, कामगार वर्गाने जागृत होण्याची वेळ आली आहे. नव्या बदलत्या कामगार कायद्यामध्ये कायम वेतनावरील कामगार हा प्रकारच बंद झाला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून लढा पुकारला नाही कायम कामगार ही संज्ञाच नाहीशी होईल. फक्त दैनिक वेतन, फिक्स पगार आणि कंत्राटी कामगार एवढेच तीन प्रकार शिल्लक राहतील. अशा लोकांच्या पाठीशी ठामपणे खंबीर उभा राहण्याचे काम कायमपणे करू.

“त्यांच्या जीवनात आनंद फुलवू”

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या अकरा कोटी लोकसंख्येपैकी तब्बल पाच कोटी लोक कामगार या संज्ञेखाली येतात. त्यापैकी केवळ ८० लाख कामगार संघटित व संरक्षित आहेत. उर्वरित सव्वाचार कोटी कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. यंत्रमाग कामगार, ड्रायव्हराचे कल्याणकारी मंडळ, घरेलू कामगार मंडळ, शेतमजूर कल्याणकारी मंडळ या सगळ्यांचा मसुदा तयार आहे. सत्ता नसली तरीही या कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करून असंघटित कामगारांच्या जीवनात आनंद फुलविणार आहोत. यावेळी राष्ट्रीय सचिव सुकुमार बांदे, सी. एम. देशमुख,
कॉम्रेड खानोजी काळे, कॉम्रेड दिलीप पोवार, कॉम्रेड सुभाष लांडे, कॉम्रेड एस. बी. पाटील, कॉम्रेड मोहन शर्मा, कॉम्रेड मिलिंद रणरे, कॉम्रेड सुभाष जाधव, कॉम्रेड अजित लवेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments