महिलेला पळवून नेणार्या धर्मांध मन्सूर अन्सारी याला अटक करा; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन ! – भारतीय बौद्ध जनविकास परिषदेचे गांधीनगर पोलीस ठाण्यात निवेदन
गांधीनगर/प्रतिनिधी : समस्त दलित समाजाच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत की एक पिडीत महिला गेली १० दिवस गायब आहे. या महिलेच्या जिवितास धर्मांध मन्सूर अन्सारी याच्याकडून धोका असल्याची शक्यता कुटुंबियांकडून वर्तवली जात आहे. पिडितेच्या कुटुंबियांकडून हा ‘लव्ह जिहाद’चा प्रयत्न असल्याचे समजते. तरी महिलेला पळवून नेणार्या धर्मांध अन्सारी याला अटक करा; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, या मागणीचे निवेदन भारतीय बौद्ध जनविकास परिषदेच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आले.गेल्या दोन मासांच्या कालावधीत अन्सारी याला ज्यांनी ज्यांनी साहाय्य केले त्यांनाही सहआरोपी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी दत्तात्रय कांबळे, उत्तम कांबळे, किशोर कांबळे, जितेंद्र कांबळे, आनंदा कांबळे, अमित कांबळे यांसह अन्य उपस्थित होते.