महादेव पाटील यांचे निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी : हसुर दुमाला (ता. करवीर) येथील महादेव विष्णु पाटील ( वय ५९) यांचे निधन झाले. आमदार जयश्री जाधव यांचे स्वीय सहाय्यक रोहित पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविर्जन बुधवार दि.१६/११/२०२२रोजी सकाळी ९ वा आहे.