Wednesday, September 11, 2024
Home ताज्या आंबेवाडी कोल्हापूर येथे श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा शाही थाटात,स्वामी भक्तांच्या गर्दीने...

आंबेवाडी कोल्हापूर येथे श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा शाही थाटात,स्वामी भक्तांच्या गर्दीने मोडला उच्चांक

आंबेवाडी कोल्हापूर येथे श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा शाही थाटात,स्वामी भक्तांच्या गर्दीने मोडला उच्चांक

कोल्हापूर, दि. १५ : प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण जप सोहळा अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार ठरला. आंबेवाडी रोडवर असलेल्या श्री दत्त स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहात १३ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वामी भक्तांच्या प्रचंड गर्दीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करत स्वामीमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रम स्थळी स्टेजवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती दिवसभर भजन, कीर्तन, नामस्मरण, सोंगी भजन, व स्वामी समर्थांची महती सांगणारा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने सजलेला श्री स्वामी समर्थ महाराज नामस्मरण जप सोहळा स्वामी भक्तांच्या अलोट गर्दीने अविस्मरणीय ठरला, मार्गशीर्ष व दत्त जयंती उत्सव निमित्त आयोजित कोल्हापूर ते श्रीक्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ चे प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्रीमंत अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हुपरी येथील स्वामी भक्त राजेंद्र नेरलीकर मिरज येथील डॉक्टर बी. एस भोसले, कोल्हापूर परिवहन च्या माजी सभापती स्वामी भक्त, प्रतिज्ञा उत्तुरे व महेश उत्तुरे, आईसाहेब फाउंडेशनचे अनिल पाटील कळंबा येथील स्वामी भक्त विश्वासराव खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते विजय सूर्यवंशी, कीर्तनकार कुलदीप साळुंखे दत्त समर्थ सांस्कृतिक सभागृहाचे मालक दीपक कचरे स्वामीभक्त रमेश सुतार यांचा श्रीमंत अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इच्छापूर्ती पदयात्रेमध्ये स्वामी भक्तांच्या जीवनात झालेला बदल व त्यांनी या पदयात्रेमध्ये स्वामींची केलेली सेवा अशा प्रातिनिधिक स्वरूपात जगमोहन भुर्के, सातापा माने, अलका लोकरे, महादेव गराडे , नारायण यादव यांचाही सन्मान करण्यात आला.
सकाळी नऊ वाजता महाराजांना अभिषेक घालण्यात आला. दुपारी दोन ते तीन या वेळेत ध्यान करण्यात आले. दुपारी तीन वाजता महाद्वार श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी चार वाजता स्पीड दिवस २४ वेबवृत्तवाहिनी यांच्या वतीने खेळ पैठणीचा हा स्वामींच्या वर आधारित माहिती देणाऱ्या विजेत्या स्वामी भगिनीस द्वारकादास श्याम कुमार यांच्या वतीने पैठणी देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुतार व प्रतीक्षा जाधव, विजय जाधव, मंगला पाटील, दीपक पाटील यांनी केले. सायंकाळी सहा वाजता नामस्मरण जप सोहळा झाला.
त्यानंतर कीर्तनकार कुलदीप साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत पाऊल भजन नामस्मरण व कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. श्री स्वामी समर्थ सोंगी भजन वडणगे यांचाही कार्यक्रम झाला. त्यानंतर उपस्थित सर्व स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कोल्हापूर ते श्रीक्षेत्र अक्कलकोट पदयात्रा २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. ११ दिवस चालणाऱ्या या पायी दिंडीमध्ये नाश्ता, जेवण व निवास व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. या इच्छापूर्ती पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सुहास पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी रमेश चावरे , अमोल कोरे, यशवंत चव्हाण, कुलदीप जाधव, राहुल जगताप, साताप्पा माने, अनिकेत परीट, सागर शिरगावे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची स्वयंशिस्त वाखाणण्याजोगी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments